bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01593
आई वडिलाचे संस्कार

आमचे मुळगाव माहुली जाहागीर ता. जि. अमरावती येथे आम्ही मोठे झालो नंतर शैक्षणिक आणि मुलांच्या शिक्षणासाठी अमरावती येथे वास्तव्यास आलो माझ्या जीवनात घडलेली घडलेली गोष्ट म्हणा किंवा कथा किंवा माझ्यावर पडलेले संस्कार माझ्या घरी सुमारे आज मी 52 वर्षाचा आहे मी लहानपणापासून माझ्या घरी गणपती पाहतो आहे गणेशजीचे आगमन होत असते मी एकदा सहज माझ्या बाबाला विचारले की आपल्या घरी गणपती केव्हापासून बसते त्यावेळेस माझ्या बाबांनी मला सांगितले की माझे बाबा लहान असताना सुमारे पाच सहा वर्षाच्या असताना खेळत असताना खेळता खेळता त्यांना डाव्या सोंडेची अष्ट धातूची गणेशाची मूर्ती सापडली आणि ती त्यांनी घरी आणली आणि माझ्या आजीला दाखवली त्यावेळेस पासून माझ्या आजीने गणपतीची स्थापना केली ती आज सुमारे आज माझ्या बाबाचे वय 88 वर्षे आहे म्हणजे जवळपास 75 वर्षापासून ही परंपरा चालू आहे असे मला वाटते . आम्ही ती परंपरा चालवत आहे आमच्या घरी पण आम्ही गणपती बसवतोच हे संस्कार जर चालत राहिले तर माझा मुलगा सुद्धा गणपती बसवेल कारण की हा माझ्यावर जसा संस्कार पडला तसेच माझ्या मुलांवर पण हे संस्कार पडणार हे मात्र नक्की पेर जशी तुम्ही पेराल तेच उगवेल शेवटी आपण आपल्या मुलांना बाळांवर संस्कार प्रसिद्धी तो त्यावर या रूढी परंपरा चालत आलेल्या वारसा संस्कृती आहे असे मला वाटते आणि हे टिकून ठेवणे आपल्या हाती आहे. गोष्ट आवडल्यास कमेंट शेअर करा आणि प्रत्येकाने आपल्या मुलांना सांगावे जेणेकरून आपली संस्कृती कायम राहील कारण की दिवसांनी संस्कृती लोक पावत चाललेली आहे.
- Kind
- Story
- Place
- Amravati
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1603 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd44ad1f4dd5cd67b8bb3717867ba1788709565d2a8b18809956d624f425caf70
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


