bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01561
विश्वविनायक मल्टिस्टेटचा पर्यावरणपूरक संकल्प, श्री. मोदक शहाणे यांच्या संकल्पनेतून!

गणेशोत्सवाच्या आनंदात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, विश्वविनायक मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन मा. श्री. मोदक प्रभाकर शहाणे यांच्या संकल्पनेतून यावर्षी एक सुंदर उपक्रम राबविण्यात आला. गणेशोत्सवात दररोज सकाळ व संध्याकाळच्या आरतीसाठी येणाऱ्या मानकऱ्यांना आंब्याचे रोप भेट देऊन निसर्ग जपण्याचा संदेश देण्यात आला. बाप्पाच्या आशीर्वादासोबत मिळालेलं हे रोप प्रत्येकाच्या अंगणात रुजावं, वाढावं आणि पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा देत राहावं, हाच या उपक्रमामागचा सुंदर उद्देश. यंदाच्या गणेशोत्सवात विश्वविनायक मल्टिस्टेटच्या पाथर्डी, शेवगाव, कोरडगाव, नेवासा व अहिल्यानगर शाखांमध्ये हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात येत आहे. प्रत्येक शाखेत आरतीच्या मानकऱ्यांना आंब्याचे रोप भेट देत ‘उत्सवासोबत पर्यावरणाचाही विचार’ हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाला विश्वविनायकच्या सर्व शाखांतील अधिकारी व कर्मचारीवृंदाचाही उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. निसर्गाप्रती आपली जबाबदारी, लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन व्हावे आणि आजचा छोटासा संकल्प उद्याच्या हिरव्यागार भविष्यासाठी मोठे योगदान ठरावा, हीच विश्वविनायक परिवाराची भावना आहे. एक रोप – एक संकल्प, हरित भविष्यासाठी!
- Kind
- Story
- Place
- Ahilyanagar
- Art
- Horticulture (Vṛkṣāyurveda-yoga) · Kala 53
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1571 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash360807ada5728463290e859a8406047cb9ff60e0e732e8664e5cfae7762c8586
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


