bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01556
आमचे प्रसिद्ध मंडळ

*३०० रुपयांपासून सुरू झालेला प्रवास आज समाजसेवेची प्रेरणादायी ओळख* *पर्यावरण गणेश* डॉ सुवर्णा हुबेकर *गोरेगाव गोंदिया :* गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव, सजावट आणि मनोरंजन न्हवे, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आहे, या विचारातून येथील राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळाने सन २००६ मध्ये अवघ्या ३०० रुपयांपासून सुरू केलेला प्रवास आज विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे एक प्रेरणादायी चळवळ म्हणून पुढे आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि समाजप्रबोधन यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः सतपाल महाराज यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव, व्यसनमुक्ती आणि विवेकवादी विचार रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. मंडळाच्या वतीने भजन स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचणी येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचे कार्यही मंडळाकडून केले जाते. धार्मिक श्रद्धेसोबत समाजप्रबोधन, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, राष्ट्रभक्ती *[BOX] राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळाचा सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीचा सेवाभावी प्रवास* मातीला आकार देणाऱ्या कुंभाराच्या भूमिकेतील गणरायाची चंदाची आकर्षक मूर्ती. *आरोग्य, पर्यावरण व सामाजिक बांधिलकी* दरवर्षी मंडळाच्या वतीने वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. तसेच ग्रामस्वच्छता अभियानात मंडळाचा सक्रिय सहभाग असतो. गावातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी मंडळाने सामाजिक प्रश्नांसाठी पुढाकार घेतला आहे. नॅशनल हायवे क्र. ७५३ वरील रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी मंडळाने पुढाकार घेत नागरिकांच्या समस्येकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपणावर भर दिला जातो. तसेच गणेश मंडळाच्या देखाव्यातून पर्यावरणविषयक जनजागृती केली जाते. आणि गरजूंची सेवा या विविध क्षेत्रांत सातत्याने कार्य करणाऱ्या राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळाने गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची जोड दिली आहे. *युवकांना सैनिक प्रशिक्षण* गावातील मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि देशसेवेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाच्या वतीने सैनिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते. या उपक्रमातून युवकांना सैन्य व देशसेवेच्या क्षेत्राकडे प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जातो. *महाराष्ट्र शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक* मंडळाच्या सामाजिक व समाजोपयोगी कार्याची दखल महाराष्ट्र शासनानेही घेतली आहे. सन २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या 'गो. ल. देशपांडे गणेशोत्सव उपक्रमांतर्गत आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत येथील राधाकृष्ण गणेश उत्सव मंडळाला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंडळाला २५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते. संकलन डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1566 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashed5b38369e99829085082977368081650b0fdd30ba0820cff3dc6443b28a0b35
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


