bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01553
||वृक्षवल्ली आम्हा सोयरे||

गणपती बाप्पाची कथा हिंदू परंपरेनुसार, माता पार्वतीने आपल्या अंगावरील उटण्यापासून गणेशाची निर्मिती केली. माता पार्वती स्नानासाठी गेल्यावर गणेशाला द्वारपाल म्हणून उभे केले. भगवान शिव परत आल्यावर गणेशाने त्यांना आत जाण्यास अडवले. त्यातून संघर्ष झाला आणि शिवांनी गणेशाचे मस्तक छेदले. पार्वतीच्या आग्रहावरून भगवान शिवांनी गणेशाला हत्तीचे मस्तक लावून पुन्हा जीवन दिले. त्यानंतर गणेशाला प्रथमपूज्य होण्याचा आशीर्वाद मिळाला. म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी “श्री गणेशाय नमः” म्हटले जाते. 🌿 घरगुती गणपतीची परंपरा महाराष्ट्रात घराघरांत गणपतीची स्थापना करून भक्तिभावाने पूजा करण्याची परंपरा आहे. मुख्य परंपरा : गणपतीची मूर्ती घरी आणणे व प्राणप्रतिष्ठा करणे सकाळ-संध्याकाळ आरती दुर्वा, लाल फुले व नैवेद्य अर्पण करणे मोदकाचा नैवेद्य कुटुंबीय व आप्तेष्टांना दर्शनासाठी आमंत्रित करणे भजन, आरती व धार्मिक वातावरण ठरलेल्या दिवशी उत्तरपूजा करून विसर्जन 🌳 “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” थीम हिरवी पाने, वेली, मातीची भांडी, छोटे वृक्ष आणि नैसर्गिक साहित्य वापरून निसर्गमय देखावा.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1563 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf7e46bbddd39e69c2b29a83c92701be012d60b85c534cc81890a8fb8626f33e9
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


