bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01544
Modak

सारण किसलेले ओले खोबरे – 1 वाटी गूळ – ¾ वाटी वेलची पूड – ½ चमचा जायफळ पूड – चिमूटभर कृती: कढईत खोबरे + गूळ घालून मंद आचेवर शिजवा. गूळ वितळून मिश्रण घट्ट झाले की वेलची-जायफळ घाला. गॅस बंद करून थंड होऊ द्या. 🍚 उकड तांदळाचे पीठ – 1 वाटी पाणी – 1¼ वाटी तूप – 1 चमचा मीठ – चिमूटभर पाणी उकळायला ठेवा. त्यात मीठ आणि तूप घाला. उकळी आली की तांदळाचे पीठ घालून लगेच ढवळा. झाकण ठेवून 2–3 मिनिटे मंद आचेवर ठेवा. मिश्रण थोडे गरम असतानाच मळून मऊ उकड तयार करा. हाताला थोडे तूप/पाणी लावून उकडीची छोटी गोळी घ्या. हाताने वाटीसारखी पसरवून त्यात सारण भरा आणि पाकळ्या करून मोदक बंद करा. मोदक 10–12 मिनिटे वाफवून घ्या. ✨ वरून थोडे तूप घालून गरमागरम मोदक सर्व्ह करा.
- Kind
- Recipe
- Place
- Thane
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1554 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb6741cec7db2d1d957ee0f649b24973bb696848aea9f371218f2ce2e45350426
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


