bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01540
एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व कै. किसन बापू कदम (आबा) संस्थापक
एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व कै. किसन बापू कदम (आबा) संस्थापक अध्यक्ष टायगर क्रीडा मंडळ. जिथे स्वतःचा विचार करता आला नाही तरी चालेल पण मी दुसऱ्याचा विचार करतो अशी वृत्ती जोपासली जाते त्या वृत्तीला "स्वर्ग" म्हणतात. ही वृत्ती जोपासणारे, दिन, दलित,गोर गरीब, अन्यायविरुद्ध दंड थोपटणारे, विनामूल्य भांडण तंटा मिटवणारे, स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता गरीब लोकांच्या कुटुंबाला आधार देणारे, परस्त्री माते समान मानणारे असे माझे वडील कै. किसन बापू कदम (आबा) यांनी १९५४ साली वाळव्यातील वाघांनी वाघा सारखे जगावे म्हणून टायगर मंडळाची स्थापना केली. आबा हयातीत असताना व नसताना त्यांची मुले, नातू सर्वांची योग्य साथ देऊन आज ७२ वर्षात मंडळांनी पदार्पण केले आहे. मंडळाला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे व करीत आहेत जे हयातीत आहेत ते सहकार्य करतात व जे हयातीत नाहीत त्यांच्या आशीर्वादाने मंडळातील सर्व सदस्य आजपर्यंत मोठ्या जोमाने काम करत आहेत. म्हणून तर ७२ वर्षात पदार्पण केले आहे. त्याला इतिहासात तोड नाही. गणेश उत्सव, व्याख्यानमाला, क्रीडा महोत्सव हे तीनही कार्यक्रम ७१ वर्षात जोमाने पार पडत आहेत. आमच्या मंडळातील सर्व सदस्य एक कुटुंब या नात्याने मंडळासाठी निस्वार्थ बुद्धीने काम करतात. त्यांना धन्यवाद देईल तेवढे थोडेच आहे.ज्या ज्या देणगीदारांनी उत्स्फूर्तपणे मंडळाला हातभार लावला आहे त्यांच्यावरती परमेश्वराची कृपा झालीच आहेत. त्यांना धन्यवाद देतो. सप्त बंधूंनी (टायगर)वडिलांनी स्थापन केलेले मंडळ कशाची अपेक्षा न करता चालवले होते व पाच टायगर नसले तरी दोन टायगर यांच्या पाठीमागे त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांची मुले, नातू नेटाने काम करतात. टायगर मंडळ ७२ वर्ष अविरहित काम करते. त्यापाठीमागील भूमिका. १)सर्व जाती,धर्मातील मुले त्यांना सन्मानपूर्वक वागणूक. २)लांडी लबाडीला थारा नाही व सर्व सदस्य अध्यक्षच आहेत. ३)देणगी दाराकडून बक्षीस वितरण व रजिस्टर असून एक पैसा ग्रँड घेतली नाही. ४)राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप नाही. ५)अडीअडचणीला सर्वजण एकत्र असतात. ६) थोरा-मोठ्यांचा आदर - मानसन्मान.
- Kind
- Story
- Place
- Sangli
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1550 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2c8310c10a4e1ad07a8cbcc880abf3598f5dfaf563d9c49053c6fbc3d0937151
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


