bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01527
गणपती 37 वर्ष जुना

अ ) मंडळाचे नाव पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ ब ) मंडळ पत्ता २/००८ पंचगंगा बिल्डिंग ना म जोशी मार्ग लोअरपरेल मुंबई ४०००१३ क ) कमिटी १) राजेश पाटील अध्यक्ष मोबाईल नंबर - ९८७०५७७९५९ २) कृष्णकांत रोडे कार्याध्यक्ष मोबाइल नंबर - ९८७०६०९७०२ मंडळाचा मेल आयडी – [email protected] मूर्ती - शाडू मातीची मूर्तिकार - राकेश घोस्टेकर (कल्याण) कला दिग्दर्शक - डॉ सुमित पाटील सजावट - पर्यावरणपूरक विषय -“स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार — आपले सफाई कर्मचारी!” ‘स्वच्छ मुंबईचे शिल्पकार’ : सफाई कर्मचाऱ्यांना अनोखी मानवंदना! पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक संदेश देणारा आगळावेगळा गणेशोत्सव देखावा मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवस-रात्र अथक परिश्रम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाला सलाम करणारा आगळावेगळा देखावा यंदा पंचगंगा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे सादर करण्यात आला आहे. ‘स्वच्छ मुंबईचे शिल्पकार’ या संकल्पनेतून साकारलेला हा देखावा गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सामाजिक संदेश देतो. या देखाव्याची मूळ संकल्पना व कलादिग्दर्शन डॉ. सुमित पाटील यांनी केले आहे. या देखाव्याच्या माध्यमातून सफाई कर्मचारी केवळ कचरा गोळा करणारे कर्मचारी नसून ‘स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार’ आहेत, हा विचार प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. नागरिकांच्या घरातून आणि रस्त्यांवरून निर्माण होणारा कचरा उचलून शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यांच्या दैनंदिन कामातील आव्हाने, योगदान आणि समाजासाठीचे महत्त्व कलात्मक मांडणीतून अधोरेखित करण्यात आले आहे. ‘ज्यांच्या हातांनी मुंबई स्वच्छ होते, त्या हातांना सलाम’ हा भाव या संपूर्ण देखाव्याचा केंद्रबिंदू आहे. देखाव्यामध्ये ‘फ्रीसायकल’ ही विशेष संकल्पना मांडण्यात आली आहे. वापरात नसलेल्या मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता गरजू व्यक्तींना देण्याचा संदेश यातून दिला जातो. फर्निचर, कपडे, पुस्तके, खेळणी, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा वस्तूंचा पुनर्वापर केल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होण्याबरोबरच गरजूंपर्यंत उपयुक्त वस्तू पोहोचू शकतात. त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून ‘कलाकार कट्टा’ ही संकल्पनाही साकारण्यात आली आहे. गायन, वादन, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, मूर्तिकाम आणि पाककला अशा विविध कलांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कचऱ्याबाबतही या देखाव्यातून जनजागृती करण्यात आली आहे. ‘मी तुमच्या शहराची कचऱ्याची गाडी बोलते आहे…’ या संकल्पनेतून नागरिकांशी थेट संवाद साधत ओला-सुका कचरा वेगळा करणे, निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करणे, प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्लास्टिक बाटल्या, स्क्रॅप मेटल, ई-वेस्ट, कागद, लाकूड आणि इतर टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून सजावट साकारण्यात आली आहे. अशा प्रकारे पंचगंगा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा हा देखावा भक्तीबरोबरच सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धन आणि ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या विचाराचा संदेश देणारा ठरत आहे.
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1537 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashffa02229f6ac36e812ffde5546ef7c08b70638752925de081b11ec9e19f2944c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


