bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01523
मिरकर सावंतांचा गणेशोत्सव

आम्ही जाकी मिऱ्या, रत्नागिरीचे सावंत. आमचे घर जे शंभर वर्षापूर्वी पासून अस्तित्वात आहे. त्या घरात माझ्या आजोबांपूर्वी पासून गणेशोत्सव साजरा केला जात असल्याची माहिती प्रत्येक अगोदरच्या पिढीने पुढच्या पिढीला दिली आहे. मातीच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन आणि कंदील आणि चिमण्यांनी प्रकाशमान झालेल्या घरापासून ते आता चाऱ्याच्या भिंती आणि स्पार्टेकच्या टाइल्स व इन्व्हर्टरचा बॅकअप असलेले घर असे आमच्या ह्या वास्तूचा प्रवास घडला. मात्र दर वर्षी गणेशोत्सव न चुकता आणि कोणतेही शास्त्राला बगल न देता साजरा केला जात आहे. आता नोकरी, धंदा व शिक्षणाच्या निम्मित घरातली मंडळी वेगवेगळ्या प्रांती अथवा परदेशी स्थलांतरित झालेली आहेत. परंतु ह्या सणाला मात्र न चुकता वेळात वेळ काढून सुट्टी टाकून हजार राहतात. आमच्या ह्या वास्तूत गणपतीच्या आगमना प्रीत्यर्थ shri सत्यनारायणाची पुजा केली जाते. दररोज बाप्पाला गोडाचा नेवैद्य दाखविला जातो. गवराईचे आगमन सुद्धा थाटामाटात होते. आमच्या गावात बाप्पाचे विसर्जन ही सामुहिकरीत्या केले जाते. ढोल ताश्याच्या गजरात साधारणतः पन्नास एक गणपतीचे विसर्जन दोन अडीच तासाच्या मिरवणुकीतून होते.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- आदेश मनोहर सावंत
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1533 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashffe084c270d75751edca013bfa2dd63be55658a860dd0bfe80511ba9d1b7666c
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


