bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01518
श्री अष्टवणे गणेश मंदिर, इतिहास

श्री अष्टवणे मंदिराची जिर्णोध्दार हा एक इतिहासच आहे. केवळ तीन महिन्यामध्ये मंदिराचा कळस चढला. जणू ही त्या गणेशाचीच ईच्छा. अष्टवणे मित्रमंडळ म्हणजे लहान मुलांनी या गणेशाची केलेली पहिली आरती व पहिली पुजा. मनोभावे केलेली ही पुजा सन १९९८ चा काळामध्ये मुलांनी या गणेशाची सेवा करावयास सुरूवात केली. सुरूवातीला याठिकाणी लाईटची सुध्दा व्यवस्था नव्हती. त्या नंतर या मध्ये प्रगती होत गेली आणि विद्युत खांबे बसविण्यात आले. जाण्यासाठी जांभ्या दगडाच्या पायऱ्या झाल्या. १८ वर्षाच्या अथक सेवेनंतर या गणेशाच्या मंदिराचा जिर्णोध्दार करावा असे या मंडळातील सदस्यांना ईच्छा निर्माण झाली आणि पहीला मुहुर्ताचा नारळ मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०१५ रोजी गणेशाच्या आरतीनंतर श्रींच्या चरणी अर्पण झाला आणि दिनांक १० ऑक्टोबर २०१५ रोजी कामाचे भूमिपूजन झाले आणि तीन महिन्यातच या मंदिराचे देखणे बांधकाम झाले. मंदिराची बांधणी अनिल भुवड यांनी केली.
- Kind
- Story
- Place
- Guhagar
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1528 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9fd3af3ea4c9b08986a998a328b0eeb4ba86472bc1221f6a69f11611e9e9aaa9
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


