bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01516
बाप्पा

वसई-विरार शहर महानगरपालिका दि.१६/०९/२०२६ *गणेशोत्सवाला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी Bappa.org उपक्रमात सहभागी व्हा* *महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन* गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा आणि सामाजिक एकात्मतेचा अविभाज्य भाग आहे. गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सामाजिक बांधिलकी, विविध कला-कौशल्ये, धार्मिक व सांस्कृतिक वारसा तसेच पर्यावरणपूरक उपक्रम यांची माहिती जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली पुरातत्व संचालनालयामार्फत Bappa.org हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा तसेच विविध गणेशोत्सव मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची नोंद व माहिती जागतिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेशभक्त, नागरिक, सामाजिक संस्था तसेच गणेशोत्सवाशी संबंधित विविध घटकांनी Bappa.org या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. या अधिकृत मंचावर गणेशोत्सवासाठी संबंधित घरगुती व सार्वजनिक परंपरा, गणेशमूर्ती स्थापना, सजावट, हस्तकला, चालीरीती, कला सादरीकरण, खाद्य परंपरा, आठवणी, सांस्कृतिक उपक्रम, पर्यावरणपूरक उपक्रम, छायाचित्रे व व्हिडीओ नागरिकांनी Whatsapp च्या माध्यमातून अपलोड करावीत व आपला सहभाग नोंदवावा. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना शासनाचे अधिकृत Digital Cultural Preserver Certificate देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची ओळख केवळ देशाच्या विविध भागांतच नव्हे, तर जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी नागरिकांचा व गणेशोत्सव मंडळांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व संबंधितांनी Bappa.org या उपक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण व प्रसार करण्यासाठी योगदान द्यावे.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1526 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1aec782d4a15875cc141abda1aee7083dd2467c17ed6016c6537bb75dde409c2
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


