bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01496
छत्रपती संभाजी नगरचा इतिहास
‘माझं शहर... माझा अभिमान!’; न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळाकडून छत्रपती संभाजीनगरचा इतिहास आणि विकासाची अनोखी जनजागृती शिवाजी तांबे, News Nation81 छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या इतिहासासोबतच विकासाची वाटचाल आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत जनजागृती करणारा अनोखा तांत्रिक स्वयंचलित देखावा न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळ, खडकेश्वर तसेच बजाज ऑटो कामगार व कर्मचारी बंधूंच्या वतीने साकारण्यात आला आहे. ‘माझं शहर... माझा अभिमान!’ या संकल्पनेतून साकारलेल्या या देखाव्यात छत्रपती संभाजीनगरचा ऐतिहासिक प्रवास, शहराची बदलती ओळख, पर्यटन, उद्योग आणि शिक्षणाच्या माध्यमातून झालेली प्रगती याबाबत माहिती देण्यात आली आहे. शहराच्या विकासासोबत DMIC, वाळूज, शेंद्रा, बिडकीन यांसारख्या औद्योगिक आणि विकास क्षेत्रांमुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्याचा संदेश या जनजागृतीपर देखाव्यातून देण्यात आला आहे. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे पाणी, वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांवर येणारा ताण लक्षात घेता नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जलसंधारण, पाण्याचा अपव्यय टाळणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, वाहतुकीचे नियम पाळणे अशा विविध विषयांवरही या देखाव्यातून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच अतिवकण आणि पोस्टरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण होऊ नये, जातीय सलोखा कायम ठेवावा, प्रत्येक धर्माचा आदर करावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असे प्रकार टाळावेत, असा सामाजिक संदेशही या देखाव्यातून देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून इतिहास, विकास आणि नागरिकांची सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडवणारा हा जनजागृतीपर देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Chhatrapati Sambhajinagar
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- पत्रकार शिवाजी तांबे
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1506 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash05e326adb60f2e1a079f2289e011dcc99900c28ec3e4aec06f08b7922ae61d1f
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


