bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01436
पर्यावरण पूरक गणेशोत्सव

वसई-विरार शहर महानगरपालिका दि.१६/०९/२०२६ *वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या गणपतींच्या मूर्तींचे उत्साहात विसर्जन; महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद* वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार दि.१५ सप्टेंबर २०२६ रोजी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात व भावपूर्ण वातावरणात पार पडले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या महानगरपालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांना यावर्षीही उत्तम प्रतिसाद दिला. यावर्षी दीड दिवसांच्या एकूण १२९८७ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. यामध्ये ११९७४ गणेशमूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले, तसेच १०१३ गणेशमूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने सोय केलेल्या जेटी, फिरते हौद व बंद दगडखाणीच्या ठिकाणी करण्यात आले. त्याचप्रमाणे संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली. मा.महापौर श्री.अजीव पाटील व मा.आयुक्त श्री.पृथ्वीराज बी.पी. (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे व श्री.दिपक सावंत यांच्या देखरेखीखाली महानगरपालिकेमार्फत यावर्षी मूर्ती विसर्जनासाठी एकूण १२८ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून दोन बंद दगडखाणींच्या ठिकाणी व पाच जेट्टींच्या ठिकाणीही विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागात २ फिरते हौद याप्रमाणे मूर्ती विसर्जनासाठी ९ प्रभागांमध्ये १८ फिरते हौद उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप व्यवस्था, आरती स्थळे, दिवाबत्ती सोय, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कलश, वैद्यकीय मदत कक्ष, सीसीटीव्ही कॅमेरे इ.आवश्यक सर्व उपाययोजना महानगरपालिकेमार्फत करण्यात आल्या होत्या. नागरिकांना त्यांच्या जवळील गणेशमूर्ती विसर्जन स्थळाची माहिती तसेच तेथे जाण्याचा मार्ग सहज व त्वरित उपलब्ध व्हावा, यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रत्येक विसर्जन स्थळाचा QR कोडद्वारे ऑनलाइन Google Location उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेमुळे नागरिकांना संबंधित विसर्जन स्थळाचे अचूक स्थान व तेथे जाण्याचा मार्ग त्वरित प्राप्त होण्यास मदत झाली. बुधवारी पहाटे सहा वाजेपर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यंदाही दगडखाणीतील विसर्जनासाठ
- Kind
- Story
- Place
- Vasai virar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1446 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash90a4250c2a2b42564412767ea5ffa29f31608129224e735cdf855c342892b05d
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


