bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01414
“३० वर्षांची अखंड परंपरा लाभलेला पाटील परिवाराचा मानाचा गणाधिपती!”

🙏 पाटील परिवाराच्या गणाधिपतीची कथा सन १९९६ पासून नवघर गावातील पाटील परिवारात गणरायाची स्थापना होत आहे. काका श्री. हेमप्रकाश पाटील यांच्या आजारपणाच्या काळात काकी श्रीम. हेमलता पाटील यांनी गणरायाला मनोभावे नवस केला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते पूर्णपणे बरे झाले. तेव्हापासून दरवर्षी श्रद्धा आणि भक्तिभावाने बाप्पाचे आगमन होत आहे. या गणरायाच्या कृपेची आणखी एक अनुभूती म्हणजे शेजारील एका दाम्पत्याने अपत्यप्राप्तीसाठी बाप्पाला नवस केला आणि पुढील वर्षी त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. अशा अनेक श्रद्धा आणि अनुभवांनी समृद्ध असलेला, नवसाला पावणारा पाटील परिवाराचा गणाधिपती गेली ३० वर्षे भक्तांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास जागवत आहे. 🙏 गणपती बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1424 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0e0a5bba498af3805a0d7b267bbdc1186a270304e0818d79d36d9a24e42683bf
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


