bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01394
बाप्पा साठी सुंदर देखावा
🌺🙏 माझ्या घरचा बाप्पा… 🙏🌺 यंदा गणरायाचं आगमन आमच्या घरी थोडं खास करण्याचा प्रयत्न केला. बाप्पासाठी जागा निवडून ती व्यवस्थित स्वच्छ करून, सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीने संपूर्ण आरास सजवली. ✨ बाप्पाची मध्यभागी आकर्षक मांडणी करून त्याभोवती फुलांची आणि सजावटीच्या साहित्याची सुंदर रचना केली. बाप्पाच्या मूर्तीचा उठाव दिसावा आणि संपूर्ण आरास अधिक खुलून दिसावी यासाठी लाईटिंगचा योग्य वापर केला. आणि बाप्पा मागच्या बाजूला महादेव यांचे मूर्ती सारखे फोटो लावण्यात आले आणि महादेवाच्या मागे चंद्र फिरत आहे असे दाखवले व आधुनिक सजावटीचा सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न केला. 🌸 फुलांची सजावट, आकर्षक पडदे, प्रकाशाची मांडणी आणि छोट्या-छोट्या सजावटीच्या गोष्टी एकत्र करून बाप्पासाठी एक सुंदर, शांत आणि भक्तिमय वातावरण तयार केलं.
- Kind
- Tradition
- Place
- Solapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1404 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash22cd7f7fbab34e513b8bd5d2ba84d6b2d39c47c91ff6f6b1e6f509f40ee5950a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


