bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01393
पड्याळांचा राजा
पड्याळांचा राजा यंदाचे 35 वे वर्ष आहे, १२ दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यत बाप्पा आमच्याकडून सेवा करुन घेतात. आमच्या संपूर्ण परिवाराचा एकत्र गणपती विराजमान होतो. आमच्या परीवारात लहान मोठे असे एकुण ९६-१०० बाप्पाचे भक्त आहेत. १२ दिवस रोज एकत्र आरती, भजन, गणपती निमित्त सत्यनारायनाची पूजा, कीर्तन, नाच, लहान मुलांचे कार्यक्रम असे विविध उपक्रम केले जातात. आमची अशी मान्यता आहे की आमचा बाप्पा हा नवसाला पावतो. नवसाला म्हणन्या पेक्षा मनापासून केलेल्या भक्ती ला पावतो. हा एकच सन असा आहे की ज्यासाठी सर्व एकत्र येतात. येतात नाही तर बाप्पच सर्वाना एकत्र आणतो. सर्व कार्यक्रम आनंदाने साजरे केले जातात.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1403 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb8a414aa9b0037dac5119c6bf61242c3437d0cdc850dd29e2a86354271254a0e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


