bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01387
180 वर्षाची घरघुती पण 2 गणपती एकत्र बसवण्याची परंपरा आहे
आम्हचे पणजोबा गणेश कावनईकर यांनी 1890 साली हा उत्सव सुरु केला त्या वेळी आमच्या कुटूंबात कोणाला पुत्र संतती होत नसे पणजोबानी नवस केला आम्हाला पुत्र संतती झाल्यास आम्ही तुझे वर्षभर पुजन करू तेव्हा पासुन कावनईकर म्हणजे आजचे कुलकर्णी कुटूंब एकाच वेळी 2 गणपती बसावतात 1 गणपती वर्षभर पुजला जातो पुढल्या वर्षी त्याचे विसर्जन होत व पुनः नव्याने मूर्ती आणली की 2 ही गणपती एकाच वेळी एकाच मखरात विराजित होतात या 10 दिवसांच्या गणेशोत्सवात गणेश याग, सत्यविनायक, सत्यनारायण महापूजा व गौरी पुजा मोठया थाटात पण पारंपरिक पद्धतीने केली जाते
- Kind
- Story
- Place
- Raigad
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1397 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha33412f2eb42ba6560d980aee9d546a28bf16ec913e78eca0d6602463824cbc4
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


