bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01383
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती

बीड जिल्ह्यातील श्री विद्यान गणेशा स्वतः दत्तात्रयांनी स्थापन केलेला "विज्ञान गणेशा!" डॉ सुवर्णा हुबेकर बीड: बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन या गावातील प्रसिद्ध गणेशा बद्दल माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे अशी आहे रोचक कथा :- राक्षसभुवन हे नाव डोळयासमोर आले की आपल्याला प्रथम शनिदेव आठवतात. याचे कारण म्हणजे या गावात भारतातील साडेतीन शनि पीठांपैकी एक असलेले हे प्रथम पीठ आहे. याची माहिती सर्वांनाच आहे पंरतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की याच गावात संपूर्ण भारतातील २१ गणेश पीठांपैकी अत्यंत महत्वपूर्ण असलेले विज्ञान गणेश मंदिर आहे. यांची स्थापना प्रभु दत्तात्रय यांनी केली आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या मंदिराची खास माहिती आणि पौराणिक महत्त्व सांगत आहोत. गणेशकोश, मुदगल पुराण, भविष्य उत्तर पुराण आणि विज्ञान गणेश मंदिराचे पुजारी संदीप लिंग्रस गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राक्षसभवन या गावी प्राचीन काळी महान ऋषि अत्रि व माता अनुसया यांचा आश्रम होता. पुजा, नामस्मरण, यज्ञ याग, गोसेवा, अतिथि सेवा, ब्राह्मण सेवा करणे त्यांचा नित्य दिनक्रम होता. त्यामुळे माता अनुसयाच्या पतीव्रतेची चर्चा सगळीकडे होऊ लागली होती. पाहता पाहता ही बातमी देव ऋषि नारदमुनी यांनी ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या पत्नींना सांगितली. आपले पती या विश्वाचे चालक, सर्वश्री असताना आपणाहून अन्य कोणी महत्वपूर्ण किंवा पतीव्रता नसावे असा त्यांना गर्व होता. राक्षसभवन या गावात आपल्यापेक्षा श्रेष्ठ पतीव्रता अनुसयामाता राहते व तिची किर्ती सर्वत्र पसरत आहे, हे त्यांना सहन झाले नाही. हि बातमी त्यांनी आपल्या पतीला सांगीतली व असा हट्ट धरला कि तुम्ही ३ जणांनी राक्षसभुवनला जाऊन अनुसयेच्या पतीव्रतेचा भंग करावा. पत्नी हट्टापुढे या ३ देवाचे काही चालले नाही. साधुचे रुप घेऊन ते भुतलावर राक्षसभुवन या गावी अत्री व अनुसया यांच्या आश्रमात आले व आवाज दिला, ''ओम भवती भिषांम देहि'. आवाज ऐेकल्यानंतर अनुसयामाता भिक्षा देण्यासाठी बाहेर आली. मात्र या ३ देवांनी तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार दिला. तेव्हा 'माझी काही चुक झाली का?', असा प्रश्न अनुसयाने विचारला. तेव्हा ३ देवांनी तिला एक अट घातली की, तु कपडे न घालता भिक्षा वाढली तर भिक्षा घेऊ नसता निघुन जाऊ. गोदा काठावर नवसाला पावणारा गणेशा
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1393 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0082968d0e3ae2fac825351c8cf2d8ff934eda72da8470a16e8d79f839052e67
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


