bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01375
तळणीचे मोदक
गव्हाचे पीठ, गूळ, खोबरे आणि रव्यापासून बनवले जाणारे हे पारंपरिक उकडीचे किंवा तळणीचे मोदक चवीला अत्यंत उत्कृष्ट लागतात. कृती १. सारण बनवणे पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करून खसखस आणि २ चमचे रवा १-२ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. त्यात किसलेले खोबरे घालून २ मिनिटे परता. आता गूळ घाला आणि मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण जास्त कोरडे किंवा जास्त घट्ट करू नका. शेवटी वेलची पूड घालून गॅस बंद करा आणि सारण थंड होऊ द्या. २. कणीक मळणे एका परातीत गव्हाचे पीठ, २ चमचे रवा आणि चिमूटभर मीठ एकत्र करा. त्यात २ चमचे गरम तुपाचे मोहन घालून पीठ हाताने व्यवस्थित चोळून घ्या. (रव्यामुळे मोदक छान कुरकुरीत होतात). थोडे थोडे कोमट पाणी घाला आणि घट्ट कणीक मळून घ्या. १०-१५ मिनिटे कणीक झाकून ठेवा. ३. मोदक वळणे मळलेल्या कणकेचे छोटे गोळे तयार करा आणि त्यांची लहान पुरी लाटून घ्या (कडा पातळ ठेवा). मध्यभागी तयार केलेले सारण ठेवा. पुरीच्या कडांना चुण्या (कळ्या) पाडून सर्व चुण्या वर एकत्र आणून मोदकाचा आकार द्या आणि वरचे टोक बंद करा. ४. तळणे (किंवा उकडणे) तळणीचे मोदक: कढईत मंद ते मध्यम आचेवर तेल/तूप गरम करा. मोदक सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. उकडीचे मोदक: मोदकपात्रात किंवा चाळणीवर केळीचे/हळदीचे पान ठेवून १५ मिनिटे मोदक वाफवून घ्या. गरमागरम मोदकावर साजूक तूप टाका मोदक तयार
- Kind
- Recipe
- Place
- Pune
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1385 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash69433d2cd8b5252c50dd781dd53e035f07811aafbde36a9d8e94a89ee4bf4c8f
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


