bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01374
लालबागचा राजा
खूप वर्षांपासून मनात एक इच्छा होती… लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं. 🙏 यावर्षी घरी बाप्पा नसेल, म्हणून मनात एक प्रश्न होता… यावर्षी गणपतीचं काय करायचं? कुठे जायचं? आणि मग अचानक मनात आलं—कदाचित बाप्पानेच मला बोलावलंय. मग ठरवलं… घरी बाप्पा नसेल तर काय झालं? आपला लालबागचा राजा तर आहे ना! चला, यावर्षी बाप्पाला भेटायला लालबागला जाऊया. आणि मग सुरू झाला तो प्रवास… बाप्पाच्या दर्शनासाठी तब्बल १२-१३ तास वाट पाहायची. इतका मोठा वेळ… कधी उन्हात, कधी गर्दीत, कधी थकवा जाणवत होता. त्या क्षणी मनात एकच विचार होता—कधी एकदा बाप्पाचं दर्शन होतंय. 🙏 पण खरं सांगायचं तर, या १२-१३ तासांच्या प्रवासात एक गोष्ट जाणवली… आपण किती वेळ वाट पाहिली, किती तास उभे राहिलो, किती थकलो… हे सगळं बाप्पासमोर गेल्यावर अक्षरशः एका क्षणात विसरून जातो. ❤ तो दर्शनाचा क्षण येतो ना… आणि समोर बाप्पा दिसतात… तेव्हा त्या १२ तासांचा थकवा कुठेच जाणवत नाही. उरतो तो फक्त आनंद, उत्साह आणि मन भरून येणारी एक वेगळीच भावना. ? आपण म्हणतो ना, “मी खूप प्रतीक्षा केली… मी इतके तास उभी राहिले…” पण बाप्पाचं दर्शन झाल्यावर जाणवतं— ही प्रतीक्षा काहीच नव्हती, कारण त्या एका क्षणासाठी हे सगळं नक्कीच सार्थ होतं. ?🌺 आजच्या दर्शनातून हा अनुभव खरंच मनापासून घेतला… बाप्पा, तू बोलावलंयस म्हणून आलो आणि तुझं दर्शन झालं… यापेक्षा मोठं समाधान आणखी काय असणार गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 लालबागचा राजा मोरया
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1384 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8572e4fd3033b9f6fbfde0f5c50d7124ea244838541daa1c39449bd839f10e6e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


