bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01352
माझा बाप्पा… आमच्या हातांनी साकारलेलं सुख! “गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!”

माझा बाप्पा… आमच्या हातांनी साकारलेलं सुख! “गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया!” बाप्पा येतो तो फक्त दहा दिवसांसाठी; पण त्याच्या आगमनाची चाहूल लागली की आमच्या घरात महिनाभर आधीपासूनच उत्साहाचं, आनंदाचं आणि तयारीचं वातावरण निर्माण होतं. बाप्पासाठी काय करू आणि काय करू नको, त्याच्यासाठी कोणते पदार्थ बनवू, किती प्रकारचे मोदक करावेत, डेकोरेशन कसं असावं, यावर्षीची थीम काय असावी… या सगळ्या विचारांनी मन आधीच बाप्पाच्या भक्तीत रमून जातं. बाप्पाचं आगमन म्हणजे आमच्यासाठी केवळ एक सण नाही, तर तो आमच्या कुटुंबाच्या प्रेमाचा, एकजुटीचा, सर्जनशीलतेचा आणि पर्यावरणपूरक विचारांचा उत्सव आहे. हाताने साकारलेला माझा बाप्पा… मी लग्न होऊन सासरी आले, तेव्हापासून म्हणजेच आज माझ्या बाप्पाला हाताने साकार करण्याच्या परंपरेला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या अकरा वर्षांपासून आम्ही शाडू मातीपासून आमच्या हातांनी गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतो. या परंपरेत बाप्पाने आमच्या घरात केवळ विराजमान होण्याचा मान मिळवला नाही, तर आमच्या प्रत्येकाच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. मी, माझे मिस्टर डॉ.मंगेश कोल्हटकर, माझे सासू-सासरे अर्चना ताई, अनंत कोल्हटकर आणि माझ्या दोन्ही मुली श्रावणी आणि कार्तिकी, तसेच घरातील सर्वजण मिळून बाप्पाला आपल्या हातांनी साकारतो. शाडू मातीचा गोळा हातात घेतल्यापासून त्याला हळूहळू आकार देताना एक वेगळाच आनंद मिळतो. त्या मातीमध्ये बाप्पाचं रूप साकारत असताना मनात कितीतरी भावना दाटून येतात. कधी सोंड नीट होत नाही, कधी मुकुटाचा आकार बिघडतो, कधी कान मोठे होतात, तर कधी बाप्पाच्या चेहऱ्यावरचं हसू मनासारखं उमटत नाही. मग पुन्हा प्रयत्न, पुन्हा हशा आणि पुन्हा नव्या उत्साहाने कामाला सुरुवात! या सगळ्या धावपळीत कधी हसायला येतं, कधी एकमेकांची चेष्टा होते, तर कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेदही होतात. पण शेवटी सगळ्यांच्या मनात एकच भावना असते—आपला बाप्पा सुंदर झाला पाहिजे आणि तो पर्यावरणपूरक असला पाहिजे! खरं तर बाप्पाला आकार देणारे हात आमचे असले, तरी त्याला सुंदर रूप देण्याची प्रेरणा आणि शक्ती बाप्पाच आमच्याकडून करून घेतो, असंच मला नेहमी वाटतं. पर्यावरणपूरक बाप्पा आणि सजावट… आमच्या बाप्पाची मूर्ती शाडू मातीपासून हाताने तयार केलेली असते. बाप्पाच्या मूर्तीपासून ते डेकोरेशनपर्यंत प्रत्येक
- Kind
- Story
- Place
- Amravati
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1362 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb251e6b54e22cb7a7edc94f804d02a2a0894192ba7630d86bd18c5fa306b95f8
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


