bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01349
गणपती आमचा सर्व सिद्धीचा

गणपती आमचा सर्व सिद्धीचा सन1925 पासून आमच्या घरामध्ये हा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात संपन्न होतो .पूर्वी एकत्र कुटुंब होते परंतु आता जरी विभक्त कुटुंब राहत असली तरीही गणेशोत्सवानिमित्त मात्र सर्वजण एकत्र येतात व गणेशोत्सव साजरा करतात . केवळ या गणेशोत्सवामुळेच आमच्या अनेक पिढ्या वर्षानुवर्ष एकत्र आहेत . म्हणजे त्यांच्यामध्ये अजूनही प्रेम बंधुभाव आहे. या गणेशोत्सवामुळे पूर्वतयारीच्या निमित्ताने घराची ,परिसराची स्वच्छता होते. तसेच जेव्हा गणेशासमोर धूप -दिप जाळला जातो त्यामुळे घरातील जीव जंतू नष्ट होतात. गणेशाची पूजा करताना आम्ही दुर्वा , फुले व पत्री वाहतो तसेच आरास करताना कवंडल ,कंगन्या वापरतो त्यामुळे निसर्गाच्या जवळ जातो निसर्गाचे महत्त्व जाणून देण्यासाठी बाप्पा आपल्याला मदत करतो. आमच्या गणपतीला आम्ही 101 उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवतो . 1101 दुर्वांचा अभिषेक केला जातो. हे सर्व एवढे मोठे काम सर्व मिळून एकत्र करतात. त्यामुळे अगदी सहज होते. गप्पा गोष्टी करत हसत खेळत हे सर्व केले जाते. गणेशोत्सवानिमित्त खूप पौष्टिक पदार्थ उकडीचे मोदक, काकडीचे वडे, तांदुळाची खीर, ऋषीची भाजी भाकरी, पंचामृत, नैवेद्य असे अनेक पौष्टिक पदार्थ खायला मिळतात. परंपरेने कायम बाप्पाला लागतात म्हणून हे पदार्थ केले जातात परंतु त्यामुळे असे पौष्टिक पदार्थ पिढ्यान पिढ्या असे पुढच्या पिढीसाठी आताच्या पिझ्झा बर्गर च्या जमान्यात आरोग्यदायी आहाराचा संदेश देऊन जातात. आमच्या मुलांना हे पदार्थ गणेशोत्सवात खायला मिळतात . म्हणजे हा गणेशोत्सव आपल्याला आरोग्यदायी आहाराचा संदेश देऊन जातो. गणेशोत्सवानिमित्ताने आमच्याकडे आरतीसाठी सर्व कुटुंब एकत्र येते त्यावेळी प्रत्येकाच्या कलागुणांना वाव मिळतो कोणी भजन गाते, कोणी वाद्य वाजवतात, कोणी स्पष्ट व शुद्ध शब्दात अथर्वशीर्ष ,मंत्रपुष्पांजली म्हणतात. गणेशासाठी सुंदर आरास करतात, कोणी सुरेख रांगोळी काढतात. तर काहीजण सुंदर व आकर्षक मोदक तयार करतात. यानिमित्ताने सगे/ सोयरे ,आप्तेष्ट मित्र मंडळी , घरी येतात गप्पा मारता, झिम्मा फुगडी खेळतात, गाणी भजन म्हणतात खूप मजा मस्ती करतात, खूप धमाल करतात आपण म्हणतो की विज्ञानाचे युग आहे. गणेशाची मूर्ती हास्यास्पद वाटणारे आहे परंतु ती प्रतीकात्मक आहे
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1359 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash775f7801b2938717754a8b2d01d4ea160ab30b561fd05e64ae819933561b8111
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


