bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01334
वटवृक्ष
वटवृक्ष (वडाचे झाड )हे भारतातील सांस्कृतिक व पर्यावरणामध्ये औषधी व दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते भारतीय संस्कृती या झाडातील पवित्र स्थान असून ते दीर्घ आयुष्य सुसंवाद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते (1) धार्मिक संस्कृती आणि महत्त्व वटपोर्णिमा: ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीचे दीर्घ आयुष्य साठी अखंड सौभाग्यासाठी वटपोर्णिमा साजरी करतात (2)त्रिमूर्तींचा वास पोरानिक मान्यता नुसार वडाच्या झाडावर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो ज्यामुळे हे झाड अत्यंत पवित्र मानले जाते (3)छाया आणि आश्रय प्राचीन काळापासून ऋषीमुनी वडाच्या झाडाखाली तपासा करत असतात आणि ग्रामपंचायतीचे निर्णय किंवा सभा या झाडाच्या छायेखाली होत असत (4)पर्यावरण आणि ऑक्सिजन निर्मिती प्रचंड ऑक्सिजन वडाचे झाड आकाराने मोठे असल्याने ते मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडते काही प्रजाती आणि जुनी झाडे ही 24 तास ऑक्सिजन देण्यास सक्षम मानली जातात (5)कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे हे झाड हवेतील कार्बन-ऑक्साइड मोठ्या प्रमाणात शोषून वातावरणातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते (6) पक्षी प्राण्यांचे आश्रयस्थान वडाची फळे पारंब्या व बिया शेकडो पक्षी वटवाघुळे आणि खारी यांचे मुख्य अन्न असतं यामुळे जैवविविधता टिकून राहण्यास मोठी मदत होते (7)मातीचे जतन आणि भूजल पातळी मुळांचा विस्तार वडाच्या मुळे जमिनीतील खोलवर जाऊन मातीला घट्ट धरून ठेवतात ज्यामुळे धूप सेल्युशन थांबते व पाण्याचे संवर्धन वडाची घनदाट सावली जमिनीतील ओलावा टिकून ठेवते आणि भूजल पातळी वाढवण्यास सहाय्य करते (8)औषधी गुणधर्म (आयुर्वेदिक उपयोग ) त्वचेचे विकार वडाच्या पानाचा रस किंवा दुग्धजन्य चिक त्वचेवरील खरूज नायटा आणि जखमावर लावल्यास आराम पडतो (9)दात आणि हिरड्यांचे आरोग्य वडाच्या झाडाने दातं केल्याने दात बळकट होतात आणि हिरड्यांच्या समस्या दूर होतात ( 10)रोगप्रतिकारशक्ती वडाची साले आणि पाणे विविध आयुर्वेदिक औषधांमध्ये मधुमेह आणि अतिसार सारख्या आजारावर उपचारासाठी वापरली जातात ( तरी सर्वांनी एक वडाचे झाड अवश्य लावावे ) अशा या वडाच्या झाडाचा मी देखावा घरी केला आहे आणि ज्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ प्रकट झाले एका मुंग्यांच्याकर्दळीवनातून त्या स्वामीचा देखावा मी घरी बनवला आहे कागदाच्या लगद्यापासून
- Kind
- Story
- Place
- Begumpur Jandiala
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- अविनाश कांबळे
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1344 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashfb59185acf28f9b2ead7f5e35238bfabf2b14542fbe4cb027ef9d525e89f40dd
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


