bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01330
महाराष्ट्र राज्यातील गणेशोत्सव सर्वात मोठा उत्सव

महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सांस्कृतिक व धार्मिक गणेशोत्सवसण आहे.मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाने आमच्या घरात एकोपा जपला जातो. मोदक असतातच.. पण लाह्यांचे पंचखाद्य नी नेवऱ्या (करंज्या) हे स्पेशल. दिड दिवस अथवा पाच दिवस उत्साहात लहानथोर मंडळी तल्लीन होतात. गणपती बाप्पाला हरयाळी ( दूर्वा) वाहतात. उत्तर पूजा झाल्यानंतर बाप्पा च्या सोंडेवर तीर्थ सोडून प्राशन केले जाते..अतिशय श्रद्धापूर्वक, मनोभावे श्रीगणपती बाप्पाची सेवाचाकरी केली जाते.. आणि जड अंतःकरणाने.. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!! ' या निनादात निरोप दिला जातो..बारमाही वाहत्या अरूणावती नदीत एकत्रितरित्या विसर्जन केले जाते. किती उत्साह नी आनंद असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर.. एक ऊर्जा मिळते .
- Kind
- Story
- Place
- Yavatmal
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- मोहन ऊर्फ समाधान ठाकरे
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1340 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2ae75603773584b3cd113af90f60641a386689c3e66bc3bf5d5c92b3e86162c5
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


