bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01326
घरगुती गणपती सजावट
"त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः।"🌍"हे गणेशा, तूच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू) आणि आकाश आहेस." म्हणजेच संपूर्ण निसर्ग निर्माण करणारी ही पंचमहाभूते म्हणजेच ईश्वर आहेत. निसर्गाचे रक्षण करणे हीच ईश्वराची खरी पूजा आहे. मानवाच्या अस्तित्वाच्या कोट्यवधी वर्षे आधीपासूनच पृथ्वीवर परिसंस्था (Ecosystem) अस्तित्वात होती. थोडक्यात सांगायचे तर, मानव हा परिसंस्थेचा निर्माता नसून, तो खूप नंतर या आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या परिसंस्थेचा एक भाग बनला. मानवाच्या अतिहस्तक्षेपामुळे पर्यावरण परिसंस्था (Ecosystem) हळूहळू आणि आता अत्यंत वेगाने बिघडू लागली आहे. ज्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला आहे. कातळसडे - वरून कोरडे आणि खडबडीत दिसणारे हे कातळसडे निसर्गाच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचे आहेत. * जलसंधारण आणि जिवंत झरे * जैवविविधता * हंगामी रानफुले * प्राणी व कीटकांचा अधिवास *थोडक्यात सांगायचे तर, कातळसडे ही केवळ 'पडिक किंवा ओसाड जमीन' नसून, तो कोकणचा पाण्याचा मुख्य स्त्रोत आणि निसर्गाचा अनमोल खजिना आहे. म्हणूनच या कातळसड्यांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.* जंगल - सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पसरलेली ही घनदाट जंगले निसर्गाचे एक अनोखे वरदान आहेत. १. हवामान नियंत्रण आणि पर्जन्यवृष्टी 2. जलसंधारण आणि नद्यांचे उगमस्थन 4. औषधी वनस्पती 5. वन्यजीव आणि जैवविविधता अशा या जंगलांचे संवर्धन आणि संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यावरणातील एक अत्यंत महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था गवताळ कुरणे ग्रासलँड . वरवर पाहता उन्हाळ्यात कोरडी आणि ओसाड वाटणारी ही कुरणे पावसाळ्यात मात्र सजीव आणि हिरवीगार होतात. * जलसंधारण आणि विहिरींचे पुनरुज्जीवन * अद्वितीय जैवविविधता * पशुधनासाठी चारा अशा वैशिष्ट्यपूर्ण या परिसंस्थेला सध्या मोठा धोका निर्माण झाला आहे याचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे *शेती* ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा कणा आहे. हे केवळ अन्न मिळवून देणारे माध्यम नसून मानवी जीवनाचा आणि पर्यावरणाचा मुख्य पाया आहे. * आर्थिक स्थैर्य * अन्नसुरक्षा * संस्कृती आणि परंपरा * मोठ्या प्रमाणावर रोजगार * पर्यावरण संतुलन यासाठी शेती टिकणे खूप महत्त्वाचे आहे गणपती बाप्पाची मूर्ती शाडूच्या माती पासून साच्याशिवाय हाताने बनवलेली आहे.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1336 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash46cfba10d10bc9a3e1134c90739014c1fc8902796be3bb5ef6c9286ef69b4007
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


