bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01320
चवथीचो सण.. गणेशोत्सव..!!

चवथीचो सण... गणेशोत्सव..!! गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सांस्कृतिक व धार्मिक सण आहे.. तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी... निसर्गाच्या कुशीत तिलारी नदी काठी वसलेले गाव.. गावातील बहुतांश कुटुंब गोयकरी.. नोकरी धंदा व्यवसाय निमित्ताने गोव्यात व इतरत्र.मी रत्नागिरी लांजात.. नोकरी निमित्त. पण गणेशोत्सव अर्थात चवथीस न चुकता घरी. मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या माथ्यावर माटोळी बांधली जाते.ती रानातील विविध फळाफुलांनी सजवली जाते. बांधण्यासाठी केवनीचे दोर काढले जातात.. निसर्गाच्या सान्निध्यातील वनस्पतीचा वापर होतो.. पर्यावरणपूरक माटोळी असते ही..!! गणेशमूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना केली जाते.. घुमट आरती होते.. एकोपा जपला जातो. मोदक असतातच.. पण लाह्यांचे पंचखाद्य नी नेवऱ्या (करंज्या) हे स्पेशल. दिड दिवस अथवा पाच दिवस उत्साहात लहानथोर मंडळी तल्लीन होतात. गणपती बाप्पाला हरयाळी ( दूर्वा) वाहतात. उत्तर पूजा झाल्यानंतर बाप्पा च्या सोंडेवर तीर्थ सोडून प्राशन केले जाते..अतिशय श्रद्धापूर्वक, मनोभावे श्रीगणपती बाप्पाची सेवाचाकरी केली जाते.. आणि जड अंतःकरणाने.. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!! ' या निनादात निरोप दिला जातो..बारमाही वाहत्या तिलारी नदीत एकत्रितरित्या विसर्जन केले जाते. किती उत्साह नी आनंद असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर.. एक ऊर्जा मिळते ... !!
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Flower Displays (Puṣpa-śakaṭikā) · Kala 26
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1330 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe332e383c306467dc47e668cd8db1e21d4beeccf8a45969ca050c58ef4230f04
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


