bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01313
गड किल्ले संवर्धन देखावा

19 वर्ष बाप्पा आमच्या घरी आगमन करत आहे...या वर्षी आमच्या बाप्पाचे आगमन एका खास आणि अभिमानास्पद ध्येयाने होत आहे. महाराष्ट्राची खरी ओळख असलेले ‘गड-किल्ले संवर्धन’ हीच या वर्षीच्या सजावटीची मध्यवर्ती संकल्पना (Theme) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि अचूक रणनीतीची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना युनेस्को (UNESCO) कडून 'जागतिक वारसा स्थळ' (World Heritage Site) म्हणून मान्यता मिळाली आहे, जो प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. गड-किल्ले ही केवळ दगडांची रचना नसून आपल्या संस्कृतीचे आणि अस्मितेचे जिवंत प्रतीक आहेत. आमच्या या सजावटीतून आम्ही स्वराज्यासाठी रक्त सांडणारे ‘ऐतिहासिक मावळे’ आणि आज या गड-किल्ल्यांचे रक्षण, स्वच्छता व संवर्धन करणारे ‘आधुनिक मावळे’ यांचा सुंदर दुवा साधला आहे. या गणेशोत्सवात आपल्या ऐतिहासिक वारशाचे रक्षण व जतन करण्याचा संकल्प करूया!
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Aboli Arvind Panchal
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1323 in a hash chain of 2,050. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2dbae077bb0a55db1d5e1a54d79871d15379bebaebd47503493990f6abfd815c
Chain headc17111c7cb3f31344e72c07df97f5592ff6faf687d8bb02aca292e2af4cbfd7f
The chain verifies end to end as of this page load.


