bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01240
वागळे यांचा गणपती

2013 पासून आमच्या घरी मी गणपती पूजन केले . घरातल्या इतर सदस्यांची म्हणजेच माझ्या पालकांची तेव्हा तयारी नव्हती .मी स्वतःच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून घरासमोर ठेवली . आणि मी लपून राहिलो . तेव्हा मी फक्त 17 वर्षाचा होतो . मग माझ्या पालकांनी ती मूर्ती घरात घेतली . हे त्यांच्या इच्छे विरुद्ध होते . परंतु माझ्या हट्टा मुळे त्यांना करावे लागले . नंतर आनंदाने ते पूजन तसेच इतर अर्चना करू लागले . त्यानंतर दोन वर्षांनी घरगुती वाद झाल्यामुळे आम्ही घरातून बाहेर पडलो पण आमच्या बाप्पाला सोबत घेऊनच . आम्ही 10 वर्षे भाड्याने राहिलो . ज्या ज्या घरात आम्ही भाड्याने राहिलो तिथे गणरायाचे पूजन केले. मला माझ्या वडिलांची खूप साथ होती .पण ते आज माझ्या सोबत नाही आहे .ते 2020 मध्ये निर्वतले. 2025 मध्ये मी माझे घर बांधले . आज 14 वर्षे नित्य नियमाने मी आणि माझे कुटुंब आमच्या बाप्पाची सेवा करीत आहे . मी असे पर्यंत सेवा करीत राहीन आणि माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाने अशीच सेवा अविरत करत राहतील अशी मनात आशा आहे .
- Kind
- Story
- Place
- Sindhudurg
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1250 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3123405621911c5992d1f5cb5c76d4fd24a4568540fe3e763c6542ad92b99a3e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


