bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01202
पर्यावरण पूरक गणेश उत्सव
गणपती बाप्पा मोरया!” यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही साकारली आहे… ‘निसर्गाचा राजा गणराया’ ही संकल्पना. आजच्या आधुनिक युगात आपण अनेकदा निसर्गापासून दूर जात आहोत. म्हणूनच यंदा बाप्पाच्या सजावटीतून आम्ही आपल्या कोकणच्या मातीशी, संस्कृतीशी आणि निसर्गाशी असलेलं नातं जपण्याचा प्रयत्न केला आहे. समोर दिसणारं हे मातीचं घर… गवताचं छप्पर… बांबू… मातीचा रंग… आणि ग्रामीण जीवनाची आठवण करून देणाऱ्या वस्तू… या प्रत्येक गोष्टीमागे एकच विचार आहे — साधेपणातलं सौंदर्य आणि निसर्गातला आनंद! आपल्या पूर्वजांनी निसर्गाला कधीच जिंकण्याचा प्रयत्न केला नाही… त्यांनी निसर्गासोबत जगण्याची कला शिकली. तीच परंपरा आणि तोच विचार या सजावटीतून पुढे नेण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. सजावटीमध्ये शक्य तितक्या नैसर्गिक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करून, ‘कमी साधनांमध्येही सुंदर आणि पर्यावरणपूरक सजावट करता येते’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण बाप्पाची खरी भक्ती फक्त मोठ्या सजावटीत नाही… तर निसर्गाची काळजी घेण्यातही आहे. चला, या गणेशोत्सवात आपण एक संकल्प करूया… प्लास्टिक टाळूया… निसर्ग जपूया… मातीचा सन्मान करूया… आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया! 🌱 उत्सव भक्तीचा… सजावट संस्कृतीची… आणि संदेश पर्यावरण संवर्धनाचा! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🏻🌿
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1212 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash11b93f1f3ed1044f94959de1ee9db71de3f31304727e3ddbd2c2a7ea1233b924
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


