bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01198
वारली संस्कृती दर्शन
वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे.मुख्यत्वे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात या जमातीचे वास्तव्य दिसून येते. वारली चित्रकला हे वारली जमातीचे वैशिष्ट्य आहे. या चित्रकलेचा प्रचार जगभरात झालेला आहे. वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, व गुजरात राज्यांत तसेच दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांत असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे, पालघर व नाशिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते. सात- आठ किंवा दहा-पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. वारली पाड्यांतच राहतात. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले असतात.
- Kind
- Story
- Place
- Sangli
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1208 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashda150f4b73f27c4fd16a402b13cda723f092540cd5d3c424bf5ac7b22b3a8e1f
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


