bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01188
Jalmagn Dwarka

यंदा आमच्या घरी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असून, आम्ही बाप्पासाठी 'जलमग्न द्वारका' ही विशेष थीम साकारली आहे. ही संपूर्ण सजावट आम्ही घरच्या घरी स्वतः तयार केली आहे. पाण्याखालील प्राचीन वास्तूचे दृश्य हुबेहूब उभे करण्यासाठी आम्ही 160 चौरस फुटांचा एक मोठा कॅनव्हास रंगवला आहे. यासोबतच लाकडी पिलर्सची (wooden slats) रचना करून एक जून मंदिर दाखवला आहे , थ्रीडी (3D) फ्लोअरिंग आणि योग्य LED लाईटिंगचा वापर करून समुद्राच्या तळाशी असलेल्या प्राचीन द्वारका नगरीचा जिवंत अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या सजावटीचे काही निवडक फोटो आणि संपूर्ण देखावा दाखवणाऱ्या व्हिडीओची लिंक या मेसेजसोबत जोडत आहे. आमची ही कलाकृती 'Bappa Org 'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, हीच सदिच्छा.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Shyam Sapkal
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1198 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd38dd52ed31afbec72cb27b8e4b2a3a782ef1e86a20f54f14cc4a0f1a1026bcd
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


