bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01187
माझी आवड
माझी आवड मला अगदी लहान पणापासूनच गणपतीची खूप आवड होती. मला आठवत मी लहान असतांना माझ्या मोठ्या बहीणीने विद्याताई मला गणपतीची मुर्ती बनवून दिली होती. ती मी आमच्या जुन्या घरात देवळीत स्थापन केली होती. माझी मोठी बहीण ही दर गणेश उत्सवाला गणपतीची मुर्ती बनवायची. तिची गणेश मुर्ती बनविण्याची एक खास पध्दत होती. ती प्रथम गणपतीचे आसन बनवायची त्यावर त्याचे स्वस्तिकाच्या आकाराचे पाय तयार करायची आणि भिंतीवर जसा कोरलेला बाप्पा असतो तसा तो तयार करायची. मी पाचवी पासून गणपतीची मुर्ती स्वत: तयार करायला लागलो हे आढवत. मी दरवर्षी मातीची गणपती मुर्ती बनवायचो. आम्ही मित्र गणपती मुर्ती बनविण्यासाठी लाल माती आणन्यासाठी अगदी दुरवर शेतात जात होतो. दरवर्षी मला गणेश मुर्ती बनविण्याची फार आवड होती. ही आवड मी माझ्या मामाकडे शिकायला गेल्यावरही जोपासली आणि मावशीकडे जेव्हा मी शिकायला होतो तेव्हा तर मावशी अगदी 10 दिवसाचा गणपती बसवायची. तेव्हा तर माला खुप भारी वाटायच. मी दर वर्षी विविधा आकारातील गणपती मुर्ती बनवायचो कधी पाटावरील, कधी विष्णू रुपातील शेषनागावर बसलेली, तर कधी पृथ्वीगोलावर उभी अशा मुर्ती बनवायचो. मवशीकडील 10 पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी पुसद येथे होस्टेलला गेलो. तिथे मला गणेश मुर्ती कराता आली नाही तर मी माझ्या होस्टेलच्या लोखंडी पेटीत अगदी स्पंज पासून छोटीसी मुर्ती तयार करुन स्थापन केले व तिचे विसर्जनही केले होते. पुढे चालून मी नोकरीला कोकणात लागलो तेव्हा लग्नाआधी मातीची मुर्ती करुन रुमला बसवायचे अगदी पुजा वगैरे सर्व करायचो. रुमला गणपतीची मुर्ती कायम पुजेला ठेवायला लागलो. लग्न झाल्यानंतर पुजेच्याच गणपतीच्या मुर्तीची आम्ही गणेशोत्सवात पुजन तसेच सजावट करायचो. मातीची वेगळी मुर्ती बनवायचो नाही. त्यामुळे ही आवड कुठेतरी मागे पाडली. पण एक दिवशी माझ्या मावशीने तु लहानपणी जशी बाप्पाची मुर्ती बनवून दर गणेश उत्सवाला बसवायचा तशी बसवत जा असे सांगितले. त्यावर्षी पासून परत मी दर गणेशोत्सवाल गणपतीची मातीची मुर्ती बनवून बसवायला लागलो. गणपतीची मुर्ती बनवतांना मला खुप समाधान मिळते. आपणच बनविलेले मुर्ती तासन् - तास पाहात रहावीशी वाटते. यावर्षी मी पालीचा बल्लाळेश्वर बनविला आहे
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Children's Toys (Bālaka-krīḍanaka) · Kala 33
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1197 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash56b82d2093b0078c9592e657f8f687a673bd0c474057caa4c7d9cb2312b9a4b1
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


