bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01180
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः

नमस्कार मी रुपेश बंगाळे छत्रपती संभाजीनगर सोबत जोडलेला फोटो हा आमच्या घरचा गणपती बाप्पा चा आहे .सजावटम्हणून आम्ही म्हणजे मी,माझा मुलगा अंश आणि पुतण्या राम व माझी पत्नी अश्या सगळ्यांनी हा स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवनातील अंदमान हा देखावा आम्ही तयार केला .बाप्पा येणार म्हटले कि घर कसे आनंदी होऊन जाते रोज सकाळ संध्याकाळ आरती मग प्रसाद म्हणून मोदक रोज त्या निमित्त आम्ही सर्व परिवार एकत्र येतो आणि आरती सोबत करतो.दर वर्षी सण तोच पण उत्साह मात्र वेगळा असतो अमी आपल्या दैनंदिन जीवनातील सगळा थकवा दूर होऊन जातो .पुढच्या वर्षी कोणता देखावा करावा असा प्रश्न मला विचारात असतात.शेवटी बाप्पाचे विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाचे विसर्जन करत असतो.
- Kind
- Story
- Place
- Chhatrapati Sambhajinagar
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- रुपेश
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1190 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1f2334462c46f4172c3b8cff989fbee3fb3d8b76521f83f9521eee376269dea8
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


