bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01166
“ही फक्त सजावट नाही… ही त्या विचारांची आठवण आहे, ज्यांनी समाजाला नवी पहाट दिली!”
सजावटीची माहिती - ही संपूर्ण सजावट मी स्वतः केलेली आहे. साधारण गेल्या दीड महिन्यापासून याचे रोज थोडे थोडे माझे काम चालू होते , मुंबई नाका व सर्कल हे नाशिकचा एक मध्य स्थान आहे इथून संपूर्ण नाशिकचे प्रत्येक माणसाचं रोजचं येणं जाणं आहे. गणपती सजावटीमध्ये मुंबई नाका वरील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्री फुले स्मारक हे एक उत्तम असे सजावट बनू शकते हा एक संदेश मला प्रत्येक नाशिककरांना द्यायचा होता त्यासाठी मी ही संपूर्ण मुंबई नाक्याचा सर्कल आणि तिथल्या एक छोट्या छोट्या गोष्टी नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे .. मी दरवर्षी गणपतीमध्ये नवीन नवीन डेकोरेशन करतो मागच्या वर्षी कोल्हापूर महालक्ष्मी चा मंदिराचा देखावा केला होता, त्याच्या मागील वर्षी सप्तशृंगी गडावरचा नांदूर गावापासून ते थेट मंदिरापर्यंतचा संपूर्ण प्रवासाचा देखावा मी केला होता , त्याच्या आधी त्रंबकेश्वर देवस्थानचे डेकोरेशन मी केले होते घरगुती सजावटीमध्ये प्रत्येकाने आज अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे सुंदर असं डेकोरेशन करून एक देखावा गणपती साठी केला पाहिजे असा एक मला वाटतं म्हणून मी एक दरवर्षी नवीन नवीन काहीतरी एक वेगळा एक उपक्रम हातात घेऊन तसे डेकोरेशन बनवतो मी एकट्याने केला आहे सर्व म्हणून एवढा वेळ लागलाय आणि थोडं थोडं करत करत इथपर्यंत पूर्ण केलेला आहे पर्यावरण पूरकच देखावा आहे हा माझा बाप्पा हा शाडू मातीचा आहे आणि ही संपूर्ण सजावट जी आहे मी फॉर्म सीट आणि पुठ्ठ्यामध्ये केलेली आहे
- Kind
- Story
- Place
- Nashik
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1176 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb33a6d333cc15302bae3a6422bfe942651f98969d6d462d04be0bb162d985463
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


