bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01160
आमच्या घरचे गणपती बाप्पा

मी लहान आहे तेव्हा पासून आमच्या घरी गणपती बाप्पा असतो. दहा दिवस आम्ही गणपती बाप्पा ची सेवा करतो. गणपती बाप्पा घरी आल्यावर खूप रमनुक राहते. नवीन नवीन प्रकारांचे मोदक खायला मिळतात लाडू सगळे कुठुंब एकत्र होते. आणि गणपतीची पूजा आरती करतो. विसर्जनाला छान प्रसाद करतात आई सोळा प्रकारच्या गणपतीला भाज्या बनवते. आजी लाडू बनवते आणि काकू मोदक असे सगळे मिळून गणपतीला जेवण बनवतात. गणपती बाप्पा घरी आल्यावर सगळे आनंदी आनंद असतो.. अशा प्रकारे माझ्या घरी खूप वर्षा पासुन गणपती बाप्पा बसवतात आणि तयारी करतात. गणपती बाप्पा मोरया 🙏 गणपती बाप्पा मला काहीच नको सर्वांना आनंदी ठेव आणि तुझी सेवा नेहमी आमच्या हातून घळत राहो हीच प्रार्थना करते!
- Kind
- Story
- Place
- Washim
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- तेजस्विनी लेहाकर
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1170 in a hash chain of 1,195. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4821267b0638509194881715475c39ae3af5cf89781083cfc4a48c803f408108
Chain head22bd7e3f02d78d812ef4e644a914ad53511c8457b42fdb66d2275f75154b9bb2
The chain verifies end to end as of this page load.


