bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01077
मोदक

कृती: 1. सारण: कढईत खोबरे आणि गूळ मंद आचेवर गरम करा. गूळ वितळून मिश्रण थोडे घट्ट झाले की वेलची पूड घालून गॅस बंद करा. पूर्ण थंड होऊ द्या. 2. उकड: पाणी उकळून त्यात मीठ आणि 1 टीस्पून तूप घाला. तांदळाचे पीठ घालून पटकन मिसळा, झाकण ठेवून 2–3 मिनिटे मंद आचेवर ठेवा. थोडे गार झाल्यावर उकड मऊ व गुळगुळीत मळा. 3. मोदक: हाताला पाणी/तूप लावून उकडीचा छोटा गोळा घ्या. पातळ वाटीसारखा पसरवा, कडा चिमटीने पाकळ्यांसारख्या करा, मध्ये सारण भरून सर्व कडा एकत्र आणून टोक बंद करा. 4. वाफवा: मोदकांना थोडे पाणी लावून किंवा केळीच्या पानावर ठेवून स्टीमरमध्ये 10–12 मिनिटे वाफवा. मोदक किंचित चमकदार दिसू लागले की तयार. गरमागरम मोदकावर थोडं साजूक तूप घालून सर्व्ह करा. गणपती बाप्पा मोरया! 🙏
- Kind
- Recipe
- Place
- Ratnagiri
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1087 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0cd5629e054ddff21ee019e0125f154fe83c7e040732f9b4a93b60990c7d5a93
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


