bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01053
वर्षानुवर्षे नवसाला पावणारा गुरामांचा राजा
आजोबा-पणजोबांच्या काळापासून चालत आलेली ही आमची श्रद्धेची आणि भक्तीची परंपरा… दरवर्षी कोकणातील मालवण-कट्टा, सिंधुदुर्ग गुरामवाडी येथे आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात.🌺🙏 गणरायाचे सात दिवस आम्ही मनोभावे पूजन करतो, भक्ती करतो आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. हा आमचा नवसाला पावणारा गणपती आहे … ज्याच्यावर आमची श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि मनापासून प्रेम आहे. ❤️ आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, तरी गणरायाने प्रत्येक वेळी आमचा हात धरला आणि उभं राहण्याची ताकद दिली. आज आमच्याकडे जे काही आहे, त्यात आमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि गणरायाची कृपा आहे...
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1063 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hasha11cf8dd9fddac520f7c267ccf9dbd5267f0a6ea7928ebf88cc8f1a2d64bb685
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


