bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01006
व्हेलचा राजा (सार्वजनिक गणेशोत्सव)

मौजे व्हेल येथे 12 ऑगस्ट 2014 पासून नवनिर्माण तरुण मित्र मंडळ व्हेल मोगरगाव यांचेमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळामध्ये सर्व जातीचे व धर्माचे लोक एकत्र येवून गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळातर्फे हिंदू-मुस्लीम एकोपा जपला जातो. नवनिर्माण तरुण मित्र मंडळ अनेक सामाजिक उपक्रम जसे शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, गरीब व अनाथ यांना मदत केली जाते. विशेषत: कोरोना काळात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुमारे 500 व्यक्तींना या मंडळातर्फे केला होता.दरवर्षी समाज प्रबोधनासाठी व अध्यामिक वारसा जतन करणेसाठी मंडळातर्फे पौराणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1016 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash008afb6798d47a0fe53eb2293683a9c7ed4b6a663cf7788b69fd2ed2d139e4a7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


