bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01005
स्केटिंग संकल्पनेवर आधारित बाप्पाची अनोखी घरगुती सजावट

‘स्केटिंग चॅम्पियन बाप्पा’च्या रूपात अधीरच्या गणेशोत्सवाची अनोखी सजावट गणेशोत्सवानिमित्त चंद्रपुरातील अधीर अमृता सुबोध जुन्नावार यांच्या घरी यंदा स्केटिंगच्या अनोख्या संकल्पनेवर आधारित गणेश सजावट करण्यात आली आहे. ‘स्केटिंग चॅम्पियन बाप्पा – अधीरचा मित्र’ अशी या सजावटीची आकर्षक संकल्पना आहे. अधीर हा लहान वयापासून स्केटिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा खेळाडू असून, त्याच्या स्केटिंग प्रवासाला गणेशोत्सवाच्या सजावटीतून अनोखी सलामी देण्यात आली आहे. सजावटीमध्ये ‘Champion Adhir’, ‘Hard Work Today, Champion Tomorrow’ तसेच ‘Focus, Speed, Balance’ असे प्रेरणादायी संदेश देण्यात आले आहेत. गणपती बाप्पांच्या मूर्तीभोवती स्केटिंग ट्रॅक, स्केटिंग करणाऱ्या मुलांची आकर्षक चित्रे, रेसिंग फ्लॅग, अधीरची ट्रॉफी व स्पर्धेतील फोटो यांचा सुंदर वापर करण्यात आला आहे. ‘Eat Modak, Skate, Repeat’ या संदेशातून गणपती उत्सव आणि अधीरच्या स्केटिंगची सांगड घालण्यात आली आहे. अधीरच्या मेहनतीला आणि त्याच्या क्रीडा प्रवासाला बाप्पांचे आशीर्वाद लाभावेत, तसेच त्याने भविष्यात देशाचे नाव उज्ज्वल करावे, या भावनेतून ही संपूर्ण सजावट साकारण्यात आली आहे.
- Kind
- Story
- Place
- Chandrapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1014 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5695f1b618aeee81bfd9f15838f96d30625816812371edb6d3dcbb6df7cd24c7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


