bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00882
आमचा घरगुती गणपती

आमच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना कधीच केली जात नव्हती. बाप्पाची स्थापना केली की घरामध्ये काहीतरी विघ्न येते अशी मान्यता होती. परंतु मला एका ब्राह्मण मित्राने आमच्या चर्चेनंतर सल्ला दिला की घरामध्ये मुलाचा जन्म झाला की काहीतरी देवाचे कार्य घरात घडायला हवी, तर मी गणपती बाप्पाची स्थापना करू शकतो. त्यावर्षी मला मुलगा झाला होता. आम्ही बाप्पाचा आशिर्वाद मिळाला म्हणुन गणपती बाप्पाची स्थापना केली. यावर्षी बाप्पाची स्थापना करण्याचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही फक्त बाप्पाची स्थापना केली होती, दुसर्या वर्षी छानसे मखर विकत आणुन छोटीशी सजावट केली होती अणि यावर्षी आम्ही स्वतः मी अणि माझ्या पत्नीने मिळून हाताने अष्टविनायकाची सजावट साकार केली आणि आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे. ही आमच्या बाप्पाची छोटीशी कहाणी आहे. 🙏🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #892 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd95818f555a56098799e81201f6138acd534fbb69b506fcbdcb565c3d9a86ca2
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


