bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00865
वडिलांच्या शिकवणीतून जपलेली गणपतीची सजावट
गणपतीची सजावट माझ्यासाठी फक्त डेकोरेशन नाही, तर बाबांनी दिलेली एक सुंदर शिकवण आहे. लहानपणापासून बाबांना गणपतीसाठी वेगवेगळे मखर तयार करताना, सजावट करताना पाहत आलो आणि नकळत त्यांच्याकडून हे सगळं शिकत गेलो. काहीतरी नवीन करण्याचा विचार, उपलब्ध वस्तूंपासून सुंदर सजावट करण्याची कल्पना आणि गणपती बाप्पासाठी मनापासून मेहनत घेण्याची सवय — हे सगळं बाबांमुळेच माझ्यात आलं. आज बाबा आमच्यात नाहीत, पण दरवर्षी गणपतीची सजावट करताना त्यांच्या हातून शिकलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत असते. माझ्या या कलेमागची खरी प्रेरणा म्हणजे माझे बाबा. ❤️🙏
- Kind
- Story
- Place
- Wardha
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #875 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashca6fedcea8948628a8f1be9b1f5bb37c7f7c88b120fa37d46d2769a614db5e82
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


