bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00856
जोशी परिवाराची ८० वर्षाची परंपरा

काही परंपरा केवळ वर्षानुवर्षे चालत नाहीत, त्या पिढ्यान्पिढ्या जपल्या जातात. आमच्या जोशी परिवाराचा गणपती ही अशीच एक परंपरा आहे. गेल्या ८० वर्षांहून अधिक काळ बाप्पाचे आगमन आमच्या घरी होत आहे. काळ बदलला, माणसं बदलली, पण बाप्पाबद्दलची श्रद्धा आणि परिवाराला एकत्र आणणारा हा उत्सव आजही तसाच आहे. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि घर आनंदाने भरून जाते. पूजा, आरती, फुलांचा सुगंध आणि विविध नैवेद्यांनी वातावरण भक्तिमय होते. या दिवसांत घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आपल्या परीने बाप्पाच्या सेवेत सहभागी होतात. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते. चौथ्या दिवशी गौरीचे पूजन आणि विविध नैवेद्य केले जातात. या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण परिवार एकत्र येतो. संध्याकाळची आरती म्हणजे या सोहळ्याचा खास क्षण—सगळ्यांचे हात जोडलेले असतात आणि घरभर एकच स्वर घुमतो… “गणपती बाप्पा मोरया!” या क्षणी असं वाटतं की आपण फक्त पूजा करत नाही, तर आपल्या पूर्वजांनी जपलेली परंपरा पुढे नेत आहोत. पाचव्या दिवशी गौरीसोबतच गणपती बाप्पाचेही विसर्जन केले जाते. निरोप देताना मनात थोडी हुरहूर असते, पण त्याहून मोठा विश्वास असतो—बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येणार. ८० वर्षांत कितीतरी पिढ्या या बाप्पाच्या साक्षीने मोठ्या झाल्या. सुख-दुःखाचे कितीतरी क्षण बाप्पासमोर अनुभवले गेले. म्हणून आमच्यासाठी हा गणपती फक्त उत्सव नाही… तो आमच्या परिवाराचा वारसा आहे, आमच्या पूर्वजांची आठवण आहे, आमच्या श्रद्धेची ओळख आहे, आणि सगळ्यांना एकत्र आणणारा प्रेमाचा धागा आहे. परंपरा अशीच पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो आणि दरवर्षी बाप्पाचे आगमन याच प्रेमाने होत राहो… गणपती बाप्पा मोरया! ❤️ पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #866 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash0c45ad37840bc8ce3a5428b500bf87a404f4832a504572f62d2241acfcffa793
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


