bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00855
माझ्या घरचा कैलासपती चा बाप्पा: गजाननाचे शिवरुप!
पुण्याच्या गर्दीत आणि धावपळीच्या आयुष्यात मी २०१४ मध्ये जेव्हा नोकरीसाठी स्थायिक झालो, तेव्हा नवीन शहर, नवीन जबाबदाऱ्या आणि भविष्याची स्वप्ने यातच दिवस व्यतीत होत होते. पण २०१६ च्या गणेशोत्सवाआधीचा तो एक दिवस माझ्या आयुष्याला एक वेगळी अन् सुंदर कलाटणी देऊन गेला. २०१६ साली माझ्या वडिलांनी ईच्छा व्यक्त केली की त्यांना पण घरी गणपती स्थापन करावा. त्या एका वाक्यात बाबांची वर्षानुवर्षांची एक सुप्त इच्छा दडली होती. मी एका क्षणाचाही विचार न करता लगेच 'हो' म्हणालो. नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांत आर्थिक अन् वेळेचे गणित सांभाळणे थोडे आव्हानात्मक होते, पण बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा होता. २०१६ चा तो पहिला गणेशोत्सव आजही तसाच ताजा आहे. छोटीशीच पण अत्यंत लोभस मूर्ती, घरच्या घरी साध्या कपड्यांनी केलेली आरास आणि बाबांच्या हातांनी झालेली पहिली आरती... त्या दिवशी घराच्या कोपऱ्याकोपऱ्यात पसरलेला धूप-अगरबत्तीचा सुगंध अन् बाप्पाचे प्रसन्न रूप यांनी माझ्या घराला खऱ्या अर्थाने 'घरपण' दिले. बाबांच्या डोळ्यांत उतरलेले ते समाधानाचे अश्रू माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी कमाई होती. पाहता पाहता दिवस निघून गेले. २०१६ ते २०२६... आज या प्रवासाला तब्बल १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या १० वर्षांत पुण्यातील माझे आयुष्य बदलले, पदोन्नती झाली, जबाबदाऱ्या वाढल्या, पण एक गोष्ट कायम राहिली—ती म्हणजे दरवर्षी भाद्रपदात बाबांच्या आग्रहाने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने सजणारा आमचा चौरंग. एक वेळ अशी होती जेव्हा बाबांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे बाप्पा घरात आला; आणि आज परिस्थिती अशी आहे की बाप्पाशिवाय आमचा गणेशोत्सव अपूर्णच राहू शकत नाही. पुण्यात स्थायिक झाल्यावर नोकरीने मला ओळख दिली असेल, पण २०१६ मध्ये बाबांच्या एका इच्छेने सुरू झालेल्या या १० वर्षांच्या परंपरेने माझ्या कुटुंबाला अखंड आनंदाचा आणि समाधानाचा आशीर्वाद दिला आहे. गणपती बाप्पा मोरया!
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 16 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #865 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6d66c5ca48fed8de92283b344c305a9caa70247ea8484834ef1bced73f62e8bb
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


