bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00831
घरगुती गणेश उत्सव आहे घरगुती गणेशोत्सव आहे
माझे पती श्री. नितीन हिंदुराव देशमुख यांचे गणपती बाप्पाशी लहानपणापासूनच एक अतूट नाते आहे. विक्रोळी पार्कसाईट येथे चाळीत राहत असताना, त्यांचे वडील पोस्ट खात्यात ड्रायव्हर म्हणून नोकरीला होते. घर फक्त १० बाय १२ फुटांचे होते आणि कुटुंबातील सहा जण त्यात राहत होते. एवढी कमी जागा असूनही नितीनजींनी लहानपणी हट्ट केला की, “आपल्या घरी गणपती बसवायचा.” जागेची अडचण होती, झोपण्यासाठीही जागा कमी पडायची; पण गणपतीवरील श्रद्धा आणि उत्साहापुढे ती अडचण कधीच मोठी वाटली नाही. वडिलांच्या पोस्टाच्या गाडीतून पुण्यासह वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाण्याच्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. काळ बदलला, परिस्थिती बदलली. दहा बाय बाराच्या छोट्याशा खोलीतून आज आम्ही 2 BHK घरात आलो. पण परिस्थिती बदलली तरी नितीनजींची गणपतीवरील श्रद्धा आणि उत्साह मात्र अजिबात बदलला नाही. आज आम्ही घरी गणपती मोठ्या उत्साहाने साजरा करतो. फुलांची सुंदर सजावट केली जाते. नातेवाईक, मित्रमंडळी तसेच त्यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील अनेक मान्यवरांना गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून आमंत्रित केले जाते. घरच्या गणपतीसोबतच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्याची त्यांची इच्छाही त्यांनी प्रत्यक्षात आणली. त्यामुळे गणपती हा त्यांच्यासाठी केवळ धार्मिक उत्सव नाही, तर त्यांच्या बालपणीच्या आठवणी, वडिलांचे कष्ट, संघर्षातून आलेले चांगले दिवस आणि समाजाशी जोडलेले नाते यांचा एक सुंदर प्रवास आहे. दहा बाय बाराच्या छोट्याशा खोलीत हट्टाने बसवलेला गणपती आज मोठ्या उत्साहात साजरा होतोय; पण त्या गणपतीमागची श्रद्धा, भावना आणि भक्ती आजही तशीच आहे. — प्रियंका नितीन देशमुख
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #841 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe602fb3a34da1f5b1645079ee854f95a919f4af0df10f13ca0dc01c33157bb04
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


