bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00796
आमच्या घरातील गेली 100 वर्षे जुनी परंपरा
आमच्याकडे गेल्या शंभर वर्षांपासून घरामध्ये श्री गणेशाची स्थापना दहा दिवसांसाठी होती परंतु यावर्षी गणपती पूर्ण बारा दिवसांसाठी आहेत आणि आम्ही मनोभावे बारा दिवस संपूर्ण कुटुंब गणेशाच्या सेवेमध्ये मग्न असतो पात्र समय गणेशाचे आरती होते त्यानंतर गणेशाला प्रसाद दाखवला जातो सर्व भक्तांमध्ये प्रसाद वाटला जातो त्यानंतर गणेशाला भोजनाचे ताट दाखवले जाते त्यानंतर गणेशाचे दुपारी विश्रांतीची वेळ असते त्यानंतर पुन्हा संध्याकाळी श्री गणेशाला महाआरती होते पुन्हा भोजन प्रसाद दाखवला जातो त्यानंतर गणेशाची निद्रेची वेळ असते त्याला शेजारती म्हणून शेत निद्रेस वेळ दिला जातो असा दिनक्रम नित्य अखंडपणे 12 दिवस असतो या बारा दिवसात गणेशाची कृपा सर्व आमच्या कुटुंबावर आणि तसेच सर्व भक्तांवर सदैव होत राहते घरातीलच एक सदस्य सारखे आम्ही गणेशाला मानतो आणि त्याप्रमाणेच ज्या दिवशी गणेशाच्या जाण्याचा दिवस येतो त्या दिवशी अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये सर्वांच्या डोळ्यांमध्ये आनंद आश्व असतात की कधी गणपती पुन्हा पुढच्या वर्षी येतील आणि आम्ही पुन्हा कधी गणेशाची सेवा करून अशा भावनेनेच आम्ही गणेशाला निरोप देतो
- Kind
- Tradition
- Place
- Ahilyanagar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #806 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashd2144ecc13b179e76f35f7403dea5b7884d03328ef67bee9ac58e3882c2909ed
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


