bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00789
गणेशोत्सव जनमानसाचा
गणेशोत्सव म्हणजे फक्त 10 दिवसांचा उत्सव असे अभिप्रेत नाही गणेशोत्सव अनेक गोरगरीब लोकांच्या हाताला काम देतो गणेश उत्सव अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हातभार लावतो अनेक व्यावसायिक महाराष्ट्र च्या कानाकोपर्यातून पुण्यातील गणेशोत्सव मध्ये सहभागी होतात कोणी हस्तकला कारागीर तर कोणी मूर्तिकार, भांडी बनविणारा, मोदक साचा, गृहोपयोगी वस्तू पासून, भातुकली , जुन्या काळातील जत्रेतील खेळ, खाद्यपदार्थ स्टॉल, पूजा साहित्य , पाणी बाटली विक्री स्टॉल अशा सर्वांनाच गणपती बाप्पा काही ना काही देत असतो. एकप्रकारे गणेशोत्सव हा अर्थकारण मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. आमच्या घरच्या गणपती उत्सव बद्दल थोडेसे शब्दपुष्प आमच्या घरचा बाप्पा असतो दीड दिवस पण वर्ष भर साठी खूप काही देतो. आम्ही पूजेतील मूर्ती बसवतो व षोडशोपचार पूजा करून नैवेद्य म्हणुन जेवणाचे ताट, घरी आईने बनवलेले उकडीचे मोदक, वाटली डाळ इत्यादी अर्पण करतो. अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, गणेश सहस्त्रनाम ,आरती इत्यादी पठण करतो. दीड दिवस पाहुणचार करून अक्षता वाहून बाप्पाचे प्रतिकात्मक विसर्जन करतो. पुण्यातील मानाचे सर्व गणपती, मिठाई व्यावसायिक चितळे बंधू, देसाई बंधू आंबेवाले ही पुण्याची शान आहेत. चौकाचौकात असलेली गणेश मंडळ ही फक्तं मंडळ नाही कार्यकर्ता घडण्याची फॅक्टरी आहे जणू उत्सव साजरा करण्यासोबत समाजकार्य करून सामाजिक भान जपणे हे कार्य सर्व मंडळ करत असतात जगाच्या नकाशावर पुण्याचे व पुण्यातील गणपती उत्सवाचे स्थान अढळ आहे यात शंका नाही हा उत्सव केवळ एकाचा नाही तर जनमानसाचा बाप्पा आपला तुमच्या आमच्या मनातला
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #799 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe18739b0dc5b9f53caba766f3b038984e681054ce86dd6a0f8a48a46f3a20fbf
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


