bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00785
आमच्या घरी विराजमान वेळकरांचा विघ्नहर्ता.
वेळकरांचा विघ्नहर्ता आमचा देखावा म्हणजे नैसर्गिक पर्यावरणपूरक वस्तूंची जपवणूक आणि त्याची माहिती नव्या पिढीला देण्याचा एक उद्देश. कोकणचा कल्पवृक्ष (माड), त्याच्या झावळ्या विणून बाजूना बंदिस्त करून पाण्यापासून संरक्षण करणे. त्याच घराच्या पावळीत त्यांना व्यवस्थित लावून पावसाच्या झाडी पासून रक्षण करणे. अशी ही संकल्पना मांडण्यात आली. कोकणच्या परंपरेनुसार आणि पावसाळ्यात मिळणारे जंगली पाने, फुले, फळं जसे कवंडळं, हरणे, शेप्टी, चंदन पाला, सुपाऱ्यांचा घड, काकडी, नारळ, कांगले, आंब्याचे टाळ यांनी सजवलेली माटी, त्याला साजेशी झावळ्यांची शाकारणी करून श्रीं ना चौरंगावर विराजमान करुन आमच्या विघ्नहर्ता चे आशीर्वाद घेण्याचा हा प्रयत्न देखाव्याच्या स्वरूपात साकारण्यात आला आहे.
- Kind
- Story
- Place
- Sindhudurg
- Art
- Cane and Wicker Work (Paṭṭikā-vetra-bāṇa-vikalpa) · Kala 30
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #795 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash69714f0a10dc23b82f17a923acad8bc57d70312ccf2be106e9d1ba9db7b5c5af
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


