bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00783
श्री गणेश उत्सव व बाप्पाची भक्ती

🌺 श्री गणेश उत्सव –बाप्पाची भक्ती 🌺 आमच्या घरातील श्री गणेश उत्सव ही केवळ पूजा नाही, तर वर्षानुवर्षे जपलेली एक सुंदर आणि भावनिक परंपरा आहे. दरवर्षी गणरायाच्या आगमनाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आणि बाप्पाची मनोभावे स्थापना करून श्रद्धेने पूजा-अर्चा करतो. 🙏❤️ बाप्पा घरी आले की संपूर्ण घरच जणू आनंदाने उजळून निघते. आरतीचा मंगलमय नाद, फुलांची सजावट, दिव्यांची रोषणाई आणि प्रसादाचा सुगंध यामुळे घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. या अकरा दिवसांत संपूर्ण परिवार एकत्र येतो, आनंदाचे क्षण साजरे करतो आणि बाप्पाच्या भक्तीत रमून जातो. हे अकरा दिवस कधी सुरू होतात आणि कधी संपतात, हे कळतही नाही… कारण बाप्पाच्या सहवासात प्रत्येक क्षण खास असतो. गणरायाच्या आगमनाने घरात आनंद, उत्साह, प्रेम आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते. 🌺✨ बाप्पाकडे एकच प्रार्थना— आमच्या कुटुंबावर सदैव आपली कृपादृष्टी राहू दे, सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी लाभू दे. 🙏 🌸 गणपती बाप्पा मोरया! 🌸 मंगलमूर्ती मोरया! ❤️🙏
- Kind
- Story
- Place
- Jalna
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #793 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash96cfae3b741bbea2b9093996127f7ce131d4438a8b402cda7d94521ea63f0718
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


