bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00772
बाप्पा हेच माझे वडील आणि माझा खरा आधार

माझे बाप्पा — माझ्या आयुष्याचे वडील ❤️🙏 माझ्या आयुष्यात अडचणी खूप आल्या… कधी परिस्थितीने हरवलं, कधी माणसांनी, तर कधी स्वतःच्या नशिबाने. या सगळ्या प्रवासात माझ्या डोक्यावर वडिलांचा हात नव्हता… वडिलांची माया काय असते, त्यांचा आधार काय असतो, हे कदाचित माझ्या नशिबातच नव्हतं. पण एक गोष्ट माझ्या नशिबात होती… माझे गणपती बाप्पा. ❤️ जेव्हा मी एकटा पडलो, तेव्हा बाप्पा माझ्या सोबत होते. जेव्हा डोळ्यांत अश्रू होते, तेव्हा बाप्पांच्या मूर्तीसमोर बसून मन मोकळं केलं. जेव्हा कुणी म्हणणारं नव्हतं, “काळजी करू नकोस, मी आहे ना…” तेव्हा मनातून एकच आवाज यायचा— “मी आहे ना… घाबरू नकोस.” 🙏 कधी कधी मला वाटतं, माझे वडील माझ्यासोबत नाहीत, पण कदाचित त्यांनीच बाप्पांना माझी जबाबदारी दिली असावी… म्हणूनच जेव्हा आयुष्यात मोठी अडचण येते, तेव्हा कुठूनतरी मार्ग निघतो. मी पडतो… पण पुन्हा उभा राहतो. मी हरतो… पण पुन्हा प्रयत्न करतो. कारण माझ्या मागे माझे बाप्पा उभे आहेत, याची मला मनापासून खात्री आहे. ❤️ लोकांसाठी गणपती बाप्पा म्हणजे देव असतील… पण माझ्यासाठी ते माझे बाप्पा आहेत. माझे वडील आहेत. माझा आधार आहेत. माझ्या प्रत्येक दुःखात माझ्यासोबत उभे राहणारे माझे माणूस आहेत. 🙏❤️ मला आजही एवढंच मागायचं आहे— “बाप्पा, माझ्या आयुष्यात कितीही अडचणी येऊ देत… पण माझा हात कधी सोडू नका.” कारण जग सोडलं तरी चालेल… पण माझे बाप्पा माझ्यासोबत असतील, तर मी कोणत्याही परिस्थितीशी लढू शकतो. ❤️🙏 गणपती बाप्पा मोरया! माझ्या बाप्पा, कायम माझ्या सोबत राहा… ❤️🥹🙏
- Kind
- Story
- Place
- Jalna
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #782 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashfacc341a68fbe71492729a295d6ba85c442d45b0a166daed0d55f347f5b52137
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


