bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00765
आमचा विघ्नहर्ता😊🙏🏻

नमस्कार मी रितेश वाल्मिक सोनार, माझे वडील माझे मार्गदर्शक, माझे सर्वस्व ह. भ. प. गुरूवर्य वाल्मिक महाराज सोनार. यांच्या संबंधीत ही गोष्ट आहे सत्यकथन आहे. तर झालं असं की काही महिन्यांपूर्वी माझ्या वडीलांना रात्री ३ च्या सुमारास अचानक छातीत दुखनं सुरू झालं मी त्यांना आहे त्या परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, वेळेवर उपचार सुरू झाले, पण जेव्हा आम्ही एकेक पायरी पुढे सरकत होतो तेव्हा धक्यांवर धक्के मिळत होते, आधी तर हा की, त्यांना ३ऱ्या वेळेस हार्ट अटॅक आला होता, मग स्पेशालिस्ट कडे दाखवलं फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे समजलं की ९ ब्लॉकेज आहेत. आणि ९ च्या ९ ब्लॉक हे ९९% झालेत, एकच शेवटचा पर्याय ओपन हार्ट सर्जरी, चान्सेस ५०-५०% होते 🥺. रिस्क होती, आणि मग गणरायाला साकडं घातलं म्हटलं गणराया अरे ईतके वर्ष कल्याण मध्ये हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले त्यांनी आणि स्वतः च्या घरातच बाप्पा आणायचा हा हट्ट होता ना रे..! आणि आता घर झालं तुझी स्थापना करायची त्यांच्या हातुन आणि आता हे संकट आणलंय तु समोर, आता तुच काही तरी चमत्कार दाखव नाही तर माझा विश्वास डगमगेल रे..! जेव्हा संकट येतात तेव्हा मनुष्य दोष देतोच, पण अजुन एक मार्ग आला समोर, नैसर्गिक बायपास सर्जरी (कृत्रिम रित्या हृदयाला व्हायब्रेशन दिले जातात, जेणे करून हृदय स्वतःच नविन नसा तयार करतं), पण चमत्कार असा की डॉक्टर स्वतः बोलले की तुमचे वडील समोर उभे आहेत ही पण देवाचीच लीला आहे, कारण ६ महिन्यात ज्या नसा तयार होतात थेरपी ने त्या नसा आधीपासूनच तयार झाल्यात वडिलांच्या, तर आता फक्त ओपन हार्ट सर्जरीच करावी लागेल, गणराला सांगितलं की त्यांना जसे होते तसे बरे करून आमच्या कडे पाठव. त्यांच्या हाताने घरी आणेन तुला आणि स्थापना करेन, आणि त्या आमच्या लाडक्या गणुल्याने आमच्या विघ्नहर्त्या गणरायाने ऐकलं आमचं, आणि ६ महिने लागतात रिकव्हर व्हायला असं सांगितलं असताना देवाच्याच कृपेनं माझे बाबा अवघ्या २-३ महिन्यातच कमालीचे बरे झाले, सर्जरी ७-८ तास चालली आणि एकदम सक्सेस झाली. आमच्या गणरायाने बाबाना आमच्यात पुन्हा आणलं. 🥹🥹 अशी ही माझी कहानी🙏🏻🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Reading Omens (Nimitta-jñāna) · Kala 61
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #775 in a hash chain of 780. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash44ef36e4759c0664224295b1c714c63b72f1387b0d25134ee3fca034979e04c4
Chain head87e1773d2c477a81ff1f26c6f31626396dd415a2a176e4618397f72ef58dbf3a
The chain verifies end to end as of this page load.


