bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-00754
आम्ही जातो आमच्या गावा

आम्ही जातों आपल्या गावा आमचा राम राम घ्यावा.. बाप्पा कोठून येतो तु आणि कुठे जातो तु.. गणरायाला आज निरोप देताना गलबलून आलं दहा दिवस तुझ्या बरोबर कसे गेले ते कळलेच नाही. मानवाच पण असंच आहे नाही का एक दिवस त्याला पण जायच आहे. किती आनंदमय वातावरण करून जातो तु अस वाटत तु जाऊच नये कायम आमच्या सोबत रहावास.पण काय ते दुनियेला ते मान्य नाही,तुला निरोप दयावाच लागतो. दरवर्षी मात्र तु वेगळाच अनुभव घेउन येतो आणि देतोही. तुझ्या मुळे माणसं एकत्र येतात आजही विज्ञानाच्या युगात तु आम्हाला भुरळ घालतोस. असाच पाठीशी ठामपणे उभा रहा आणि पुढच्या वर्षी लवकर ये! एवढंच चल तर मग उशीर होतोय तुझी आणि माझी कोणीतरी घरी वाट पाहतय. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🏻🙏🏻 अजित ढवाण पाटील पाटस दौंड जि पुणे 🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Kangaon
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #764 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5b83377498491303aeb7ddb7605a760a3638b7a8bb7c0390da3117161b7fa566
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


